धाराशिव, – पुण्यातून अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पो.ना. बबन जाधवर व चालक पो.ह. महेबुब अरब यांच्या पथकाने ही कारवाई केली.
घटनाक्रम असा की, पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती पो.उ.नि. निलेश मोकाशी यांनी धाराशिव गुन्हे शाखेला दिली होती. त्यानंतर तपासदरम्यान तुळजापूर येथील सुनिल सिताराम भोसले व त्याच्या साथीदारांवर संशय आल्याने पोलिसांनी ताबडतोब कारवाई सुरू केली.
तपासात समोर आले की, सुनिल भोसले (वय ५१, रा. तुळजापूर), शंकर उजण्या पवार (वय ४०, रा. हासेगाव, ता. लातूर) आणि शालुबाई प्रकाश काळे (वय ३५, रा. तुळजापूर) या तिघांनी पुण्यातून कोमल धनसिंग काळे (वय २ वर्षे) हिला अपहरण करून लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे ठेवले होते.
पथकाने या तिघांना ताब्यात घेत अपह्रुत मुलीची सुखरूप सुटका केली. यानंतर सर्व आरोपी व मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील पो.उ.नि. निलेश मोकाशी व मपोअं डुकरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धाडसी व वेगवान कारवाई करत चिमुकलीला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप परतवणाऱ्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- भुम शहरात ३१ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी लागू — आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी समिती गठीत – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला
- दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण प्रकरण उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कारवाई, तीन आरोपींना अटक
- दुर्गप्रेमी, मराठी भाषा प्रेमी उद्धव ठाकरे