सायली गवळी / चिंचणी :*
सांगली जिल्ह्यातील आरवडे गावामध्ये संस्कारभारती दीपावली परिवार मेळाव्यामध्ये राहुल कुंभार या शिल्पकाराने आपली शिल्पकला दाखवली . मिरज येथील कुंभार यांनी अनेक शिल्पकला तसेच मातीची खेळणी इत्यादी बनविले आहेत . त्यांची मिरजमध्ये कुंभार म्हणून ओळख आहे .
त्यांनी जी डी आर्ट मधून आपले शिक्षण घेतले आहे . तसेच कोल्हापूर मधूनही त्यांनी पुढील आर्ट शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे . त्यांचे शिल्प जगभरात प्रसिध्द आहे . पुर्व सीमा विकास प्रतिष्टानची . भैय्याजी काणे विध्यालय मणिपूर येथे नुकतीच त्यांनी बनविलेले कै. भैय्याजी काणे यांचे मुर्ती शिल्प बसविण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे सुहास काणे व गिरीश जी कुबेर, सुंदर लक्षमण , प्रदिप कदम व जयवंत कोंडविलकर यांचे शिल्प मिरजेतील शिल्पकार राहुल कुंभार यांनी तयार केले आहे .
भारताच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच मणिपूर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता म्हणून शंकर दिनकर उर्फ भैय्याजी काणे यांची मूर्ती बनविली आहे . ती बक्षिसास पात्र ठरली . राहुल कुंभार हे मार्बल , फायबर , ब्रॉंझ , सिमेंट व पी ओ पी अश्या माध्यमात मुर्त्या बनवितात . ते अनेक कार्यक्रमामध्ये शाडूच्या मातीने मूर्तीचे डेमोन्सट्रेशन दाखवतात आणि मूर्ती हुबेहूब जशीच्या तशी बनवितात . ते दिवाळीच्या सणाला मातीच्या पणत्या , मातीची खेळणी बनवितात आणि विक्रीसाठी ठेवतात .
ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचे पूजा केली ते धौंडीराम कांबळे यांची मूर्ति बनविली . जत मध्ये शांताबाई होनमाने , मेजर – कौंडिबा काशिद तसेच कर्नाटकमध्ये भोज येथे बसवेश्वरांचा 5.5 फूटी शिल्पकला बनविली आहे .
पुण्यामध्ये संस्कारभारती कार्यक्रमाध्ये साम चैनल करिता बालाजी तांबे यांची मूर्ति साकरली आहे . सांगली येथे कलापी इंडस्ट्री कंपनी यानी अश्वारूढ़ शिवजी महाराजांचा पुतळा राहुल कुंभार यांच्यकडुन करवून घेतला आहे .
सांगालीच्या तरंगमैफिल या कार्यक्रमात त्यानी फ़िल्म मध्ये अँक्टिंग करणारे सुप्रसिद्ध यानी जोगवा , पोलिस , ढग , पेज 3 तसेच पोलिस या फ़िल्म मध्ये काम करणाऱ्या उपेंद्र लिमये यांच्याही मूर्तिचे डेमोंस्ट्रेशन करुन दाखविले आहे .