धाराशिव दि. १२ (प्रतिनिधी) – शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीपळी मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक असलेली सेंट्रल किचन प्रणाली बंद करा, केरळ राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना 18000 मानधन द्या, विनाकारण विना चौकशी कामगारांना कामावरून कमी करू नका, दहा महिने ऐवजी बारा महिने शालेय पोषण आहार कामगारांना मानधन द्या, एक एप्रिल पासून झालेली मानधन वाढ कामगारांच्या खात्यात ताबडतोब जमा करा, इंधन भाजीपाला व पूरक आहार व पूरक आहार बिल ऑनलाईन करणाऱ्या शिक्षकाला निलंबित करा व ते बिल त्यांच्या पगारीतून कपात करून कामगारांना तात्काळ वाटप करा, ज्या कामगारांचे वय 65 वर्षे आहे अशा कामगारांना सेवा पुरती म्हणून एक लाख देऊन त्यांना तीन हजार रुपये दरमहा पेन्शन सुरू करा व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव शालेय पोषण आहार कामगार म्हणून शाळेमध्ये नियुक्ती करा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता यावेळी जिल्हाध्यक्षा कुसुम देशमुख, सुरेश धायगुडे, विष्णु शिंदे, बाळासाहेब निकम, सोनाली साळुंखे, सीमा येलदरे, मनीषा धामणे, शितल तौर, दिपाली देशमुख, मनीषा पवार, महिमा पवार, निर्मला पवार, अलका भोसले तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym