पाडोळी-उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव पाच दिवस समितीने ठरविलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांने काल(दि२३) महाराजांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढून संपन्न करण्यात आला.
टाकळी(बें) येथील शिवगर्जना ग्रुपच्यावतीने प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी महाराजांच्या प्रतिमेची पूजन आणि व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रतिमेचे पूजन बेंबळी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. गोरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे,औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री तानाजी चव्हाण आणि शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे,दत्तात्रय सोनटक्के, चेअरमन तानाजी गायकवाड, माजी सरपंच काकासाहेब पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.पूजनानंतर नंतर शिवव्याख्याते प्रा. नंदकुमार नन्नवरे यांनी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन केले. सायंकाळी ८ वाजता तुळजापूर आणि टाकळी(बें) कलाकारानी मिळून *सौभाग्य नाही नशिबी* हा तीन अंकी नाटक आयोजित केला होता.त्यानंतर (दि२०) सायंकाळी जेजुरी येथील महिला कीर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले यांचे कीर्तन झाले तत्पूर्वी प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि कीर्तनकार नेहाताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर (दि२१)शुक्रवार आणि शनिवारी (दि२२) मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन कळंब -उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक ऍड.निलेश बारखडे पाटील, संचालक सुजित बाकले, दादा सुरवसे, विजयकुमार पवार, भारत गुंड, विकास ढवळे, अमर गुंड, भारत सोनटक्के, रमेश सूर्यवंशी यांनी केले. तर दुसऱ्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, सरपंच आशाताई सोनटक्के,ग्रामपंचायत सदस्य प्रताप गायकवाड, महादेव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक स्पर्धेत खुल्या गटात प्रथम क्रमांक रायगड येथील साई प्रेरणा ग्रुपने पटकाविला,तर द्वितीय क्रमांक तनुजा शिंदे (लातूर) लहान गट प्रथम क्रमांक जगदंब ग्रुप तुळजापूर, द्वितीय यश क्लॉसेस उजनी याने पटकाविला.यावेळी टाकळी(बें) येथील माजी सैनिक मोतीलाल थोरे आणि जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक हणमंत जगताप सर यांचा शिवगर्जना ग्रुपच्यावतीने सहपत्नी सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी रविवारी(दि२३) सायंकाळी पाडोळी(आ) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस पी.एम. आलुरे, व्ही.आर.पेठे, आणि श्री तांबे साहेब पोलीस बंदोबस्त मध्ये भव्य अशी गावातून मिरवणूक काढून सहकार्य केले..यावेळी शिवगर्जना ग्रुप अनिल पवार,ज्योतिराम जाधव, शिवशांत काकडे, मंगेश दळवे, दीपक तौर, काकासाहेब सोनटक्के, श्रीधर नरवडे, राम खटके, सागर सूर्यवंशी,संतोष बर्डे, संदीप सूर्यवंशी , इम्रान पठाण,अनिल सूर्यवंशी, गणेश गायकवाड, दयानंद सोनटक्के, बळीराम खटके, धनाजी कुंभार, आण्णा तौर, पांडुरंग मोरे, दत्ता सूर्यवंशी, भैरू सूर्यवंशी, सूरज पाटील, अमोल मोरे, विशाल ठवरे, सुरज नरवडे, रामा सोनटक्के, अमोल सूर्यवंशी,चंद्रकांत नरवडे, दादा जाधव, श्रीकांत सूर्यवंशी, नामदेव काकडे,नितीन गायकवाड, रोहन कणसे, तानाजी शेंद्रे, दीपक चव्हाण यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.