शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

0
76

माडग्याळ:-सनमडी ता. जत येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  प्रकरणी एका शिक्षकावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलीने नराधम शिक्षकाने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी संशयित शिक्षक सतिश अंकुश कांबळे( वय 38) रा.सनमडी यांच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात  पोक्सो कायद्यानुसार  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबधीत शिक्षक जत जवळ एका  प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक असल्याचे समजते.तसेच तो शिक्षक सनमडी गावाचा माजी उपसरपंच होता व सध्या त्याची पत्नी गावाची ग्रामपंचायत सदस्य आहे.
     पोलीसांनी दिलेली व घटनास्थळ वरून अधिक माहिती अशी , पीडित मुलगी ही अल्पवयीन असून दिनांक 09 एप्रिल रोजी दुपारी अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसल्याचे संधी साधून शिक्षकांने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेतील पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून शिक्षक सतिश कांबळे यांनी मुलीच्या घरी जाऊन तिला आपल्या घरी येण्यास सांगितले त्यावेळी मुलीने नकार दिला त्यावेळी मुलीला धमकावून घरी घेऊन गेल्याचे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर घरात कोणी नसल्याने मुलीने येथे का बोलावले असे विचारले असता त्यांनी तिला जबरदस्तीने झोंबाझोंबी करून बलात्कार केला. .
      यानंतर ही संबंधित शिक्षकाने  11 एप्रिल रोजी गच्चीवर पापड काढण्यासाठी गेलेल्या मुलीला धमकी देत परत बोलावले असता मुलीचे भाऊ आल्याने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. मुलीचे आई वडील मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवत आहेत.     
       नराधम शिक्षकाने घरी कोणी नसल्याचे संधी साधून अल्पवयीन मुलीला धमकी देत बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षक  सतिश कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.
   उमदी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकावर   बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तो शिक्षक फरारी झाला. उमदी पोलिसांनी त्या शिक्षकाचा सनमडी परिसरात  शोध घेतला. पण तो शिक्षक सापडला नाही.
 
            नात्याला व शिक्षकी पेशाला काळिमा


संबधीत मुलगी व त्या नराधम शिक्षकाचे नाते भावकितील होते. पेशाने शिक्षक व गावचा माजी उपसरपंच असल्याने नात्याला व शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे काम त्यांनी केले.

             मिटवण्याचा प्रयत्न फसला
दि.11 शुक्रवारी दुपारी घटना घडल्यानंतर अनेकांनी मिटवण्याचा प्रेयत्न केला परंतु तो प्रेयत्न फसला अखे र संध्याकाळी गुन्ह्याची नोंद उमदी पोलीस ठाण्यात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here