उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील आरळी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबवत कोरोना आजाराची जनजागृती केली आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतीने कोरोना सहाय्यता समितीची स्थापना केली. त्याअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी चौथी ते आठवीचा ‘अ’ आणि ९ वी ते बारावी ‘ब’ गट असे दोन गट करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माझी भूमिका हा स्पर्धेचा विषय ठेवण्यात आला. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन घेण्यात आली. घरी बसून विद्यार्थ्यानी निंबंध लिहून व्हॉट्स अप च्या माध्यमातून आ आयोजकांकडे पाठवण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्याना घरी तर बसावेच लागले मात्र स्वतः ची निबंध लिखाणाच्या कलेला वाव मिळाला सोबतच कोरोना या भयंकर विषाणू बद्दल जनजागृती देखील झाली. आणि प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देखील मिळाले. असे अनेक हेतू या उपक्रमातून आयोजकांनी साधले आहेत. ११ एप्रिल रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रणव पौळ , करण गाडे, सानिया पठाण,जोया सय्यद, किरण गाडे, प्रतिभा नीचळ या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा आरळी आणि जिल्हा परिषद शाळा कदमवाडी येथील शिक्षकांनी आपले योगदान दिले.