पालकमंत्री तनाजी सावंत यांचा राजीनामा घ्या – माजी आमदार राहुल मोटे

0
114

 


धाराशिव – भूम परंडा वाशी मतदारसंघात गुन्हेगारीला पालकमंत्री तानाजी सावंत यांचे संरक्षण आहे. मतदार संघात घडलेल्या अनेक घटनांमध्ये पोलिसात तक्रार करण्यामध्ये नागरिकांना भीती वाटत असून महाराष्ट्राचा बिहार होतो आहे की काय अशी परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेत केली.


महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बुद्धिवान लटके यांना १२ जून रोजी झालेल्या मारहाणीच्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी दरम्यान संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. 


बुद्धिवान लटके यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग या पत्रकार परिषदेत सांगितला तसेच  जसे तक्रारीचे कथन केले तशी तक्रार दाखल केली नाही, सोन्याची चेन, पैसे मारहाण करणाऱ्यांनी नेले त्याबाबत पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा आरोप केला. 


जर त्यावेळी गंभीर गुन्हे दाखल केले असते तर आरोपी सुटले नसते – ॲड. सुजित देवकते

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीपूर्वी उजनी डॅम येथील रेस्ट हाऊस वर ज्या पद्धतीने मारहाण करून, अपहरण केले त्या गुन्ह्यात पोलिसांनी दबावाखाली साधी कलमे लावली त्यामुळे आरोपी जामिनावर सुटले. त्याच वेळी गंभीर कलमे लावली असती तर दुसरे कृत्य करण्याचा कॉन्फिडन्स इतरांना आला नसता असे ॲड. सुजित देवकते यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला राहुल मोटे, रणजित पाटील, ॲड. हनुमंत वाघमोडे यांची उपस्थिती होती


दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा 


https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here