खानापूर(प्रतिनिधी)तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथे गुरुवारी दि.16 रोजी मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज कोसळून एक बैलाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेल्या पावसात येथील शेतकरी तुकाराम पांडू भोजू त्यांच्या शेतामध्ये झाडाखाली बांधलेल्या त्यांच्या बैलाचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.हा बैल दगवल्याने त्यांचे अंदाजे 50 हजारापर्यंत नुकसान झाले.या घटनेचा पंचनामा तलाठी शिंदे एस.एम,पोलीस पाटील नंदिनी मुळूक यांनी केला आहे.
कोरोनाच्या संकटात अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला याचा अजून आर्थिक मोठा फटका बसला आहे.तरी शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.