सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ येथे आज दुपारी नव्याने 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या दहा कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची सिविल हॉस्पिटल येथे चाचणी करून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ठेवले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. दरम्यान पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्युनंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला होता या दुकानदाराच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तपासणीत सोलापूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारी महिला ही पॉझिटिव्ह आढळली होती. या पॉझिटिव महिलेच्या ताब्यातील 22 जणांची तपासणी सिविल प्रशासनाने केली होती त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव आढळले आहे तर मृत्यू किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका नातेवाईकाचा ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सोलापुरातील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या 11 वर गेली आहे. गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देत नव्याने आज दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे सांगितले आहे.
.10 पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 49 जणांचे रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे ते रिपोर्ट काय येणार याची धाकधुक जिल्हा प्रशासन व सोलापूर शहर जिल्हावासीयांना लागली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची सिविल प्रशासनामार्फत तपासणी झाली असून त्यांना आयसोलेशन वॉर्डात ऍडमिट करण्यात आले आहेत.
.् सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठ केंद्रबिंदू मानून त्याच्या आजूबाजूचा एक किलोमीटर परिसर सील केलेला आहे. जिल्हाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सील केलेल्या परिसरात दररोज सात हजार 261 घरांची तपासणी सुरू असून 46 हजार 429 जणांची तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले. या तपासणी मोहिमेत 32 व्यक्तींना किरकोळ लक्षणे असल्याचे आढळले आहे तर दोन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहेत.
स्थलांतरित परजिल्ह्यातील जे मजूर सोलापूर शहर जिल्ह्यात आले आहेत त्यांच्यासाठी निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली असून सोलापूर शहर जिल्ह्यात 65 निवारा केंद्र तयार करण्यात आले असून त्यामध्ये 5231 स्थलांतरित मजूर कामगार आहेत त्यांना मोफत पणे मेडिकल सुविधा जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.
पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईनुसार 2510 जणांवर प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून 233 जणांना अटक झाली आहे तर 7233 दुचाकी वाहने व इतर वाहने जप्त केले असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.