उस्मानाबाद – जिल्ह्यात कोरोना पाॅझीटीव्ह आढळलेल्या रुग्णाचे अंतिम अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. त्या तीनही रुग्णांना आज दिनांक २० रोजी डिस्चार्ज देणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात २ एप्रिलला उमरगा तालुक्यातील बलसुर येथे पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर लोहारा तालुक्यात एक आणि उमरगा येथे तिसरा रुग्ण आढळला होता. या तीनही रुग्णांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली ती निगेटीव्ह आल्याने तूर्तास उस्मानाबाद जिल्हा कोरोना
मुक्त झाला असे म्हणता येईल.