पाडोळी ( प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथे पुणे, मुंबई, सोलापूर ,औरंगाबाद या शहरात अडकलेल्या व्यक्तींना शासनाने आपापल्या गावाकडे जाण्याची परवानगी दिल्यामुळे शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या पट्टीने वाढली आहे.
पहिल्या लॉकडाऊन पासून बाहेर गावाहून टाकळी(बें) गावात दाखल झालेल्याची संख्या २६५ इतकी झाली आहे. तर आज रोजी ५३ व्यक्ती हे क्वारंटाईन मध्ये आहेत. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत ही क्वारंटाईन लोकांची व्यवस्था करत नसल्याने अनेक लोक हे आपापल्या परीने स्वतःच्या शेतात क्वारंटाईन होत आहेत. जिल्हा परिषद शाळेत २५ व्यक्ती क्वारंटाईन असून २८ व्यक्ती हे शेतात क्वारंटाईन आहेत. या पुढे ही बाहेर येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे येथील ग्रामपंचायतने वेळीच दक्ष राहून शक्य होईल तेवढ्या व्यक्तींना येथील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करावे ,क्वारंटाईन व्यक्तीची पिणेचे पाणी, सांडपाणी, सुलभ शौचालय आदी बाबीची संपूर्ण व्यवस्था करावी अशी सुजाण नागरिकांतून मागणी होत आहे., कारण अधून मधून पाडोळी(आ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी येत असतात, अश्यामध्ये फक्त शाळेत क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीची तपासणी केली जाते मात्र शेतात असलेल्या व्यक्तीची तपासणी होत नाही आणि शेतात राहत असलेले व्यक्ती हे अनेकांच्या संपर्कात व सोशल डिस्टन्स ठेवत नसल्याची चर्चा पूर्ण गावभर होत आहे, त्यामुळे टाकळी(बें) गावास कोरोनाचा धोका नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायतने बाहेर गावाहून येणाऱ्याची संख्या ओळखून क्वारंटाईन व्यक्तीची जिल्हा परिषद शाळेत पूर्ण व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
टाकळी(बें) येथे ५३ जण क्वारंटाईन
RELATED ARTICLES