मगरवाडी / प्रतिनिधी
भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी जंगलात
नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुळूज (ता. पंढरपूर) येथील क्युआरटी पथकातील पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने (वय26) हे आज हुतात्मा झाले. हुतात्मा धनंजय होनमाने यांचे गावातील एका मुलीशी विवाह ठरला होता. सुट्टीवर आल्यानंतर पुढच्या महिन्यात विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तानाजी होनमाने यांचे शेतकरी कुटुंब आहे. त्यांना विकास आणि धनंजय होनमाने ही दोन मुले. धनंजय हा लहानपणापासूनच हुशार होता. पोलिस खात्यामध्ये भरती होवून देश सेवा करण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो तीन वर्षापूर्वी क्युआरटी पथकात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी भरती झाला. धोरला भाऊ विकास हा उच्चशिक्षण घेत आहे. वडील तानाजी होनमाने आणि आई पुळज येथेच शेती करतात. अत्यंत हालाखीमध्ये धनंजयने आपले प्राथमिक शिक्षण पुळूज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले.
त्यानंतर तो पोलिस खात्यामध्ये भरती झाला.धनंजय हा लहानपणापासूनच अत्यंत हुशार होता. त्यांच्या मृत्युने त्यांच्या आई वडीलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अलीकडेच लग्न ठरले होते. गावातील मुलीशी विवाह देखील पुढच्या महिन्यात होणार होता.
कर्तव्यावर असताना आज भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला.या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पुळूज गावावर शोककळा पसरली.