महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच च्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी या ठिकाणी आहे. तसेच अहिल्यादेवी यांचे सामाजिक कार्य खुप मोठे आहे. वैद्यकीय महाविद्यालयास त्यांचे नाव दिल्यास भविष्यात त्यांचा आदर्श घेवून हे विद्यार्थी आपल्या सामाजिक, प्रशासकीय व वैद्यकीय व्यवसाय करतानाअहिल्यादेवी यांचा आदर्श घेवून आपले काम करतील म्हणून उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, डॉ. संतोष पाटील, प्रा. मनोज डोलारे, नवनाथ काकडे,बिभीषण लोकरे, गणेश सोनटक्के, राहुल काकडे, नरसिंह मिटकरी, अशोक गाडेकर, बालाजी तेरकर उपस्थित होते.