back to top
Saturday, September 14, 2024
Google search engine
Homeसोलापूर९ हजारांची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळयात

९ हजारांची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी अँटीकरप्शनच्या जाळयात

कुर्डुवाडी दि.२९(प्रतिनिधी) प्रसूतीसाठी लाचेची मागणी करणारे कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना ९ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी येथे करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदाराची पत्नी ही गर्भवती होती तिला प्रसूती वेदना होत असल्याने ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी ता.माढा येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. सदर ठिकाणी नेमणूकीस असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष आडगळे यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या प्रसूती साठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती मात्र तडजोडीनंतर शुक्रवारी सकाळी ९ हजार रुपये देण्याचे ठरले यानंतर तक्रारदाराने  लाचलुचपत विभागाला याबाबत माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून प्रसूतीकरीता डॉ. आडगळे यांना ९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून चौकशीकरिता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई राजेश बनसोडे पोलिस अधिक्षक लाचलुचपत विभाग पुणे,सुरज गुरव अप्पर पोलिस अधिक्षक लाचलुचपत विभाग पुणे यांच्या व संजीव पाटील पोलिस उप अधिक्षक लाचलुचपत विभाग सोलापुर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस काॅन्स्टेबल उमेश पवार, पोलिस काॅन्स्टेबल स्वप्निल सणके यांनी केली.याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments