नूतन इमारतीमध्ये आठ दिवसात शंभर बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कोव्हीड सेंटर सुरू करण्यासंदर्भात मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा
कोव्हिड रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन
आठ दिवसात नूतन कस्तुरबा रुग्णालयात मोफत कोव्हिड सेंटर सुरू न झाल्यास तासगावातील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागण्याची शक्यता
तासगाव प्रतिनिधी /राहुल कांबळे
तासगाव शहरांमध्ये जुन्या काळातील शासकीय महाविद्यालय मिरज संलग्नीत कस्तुरबा रुग्णालय नावाने रुग्णालय सुरू होते. परंतु तेथे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सुरू करण्यासाठी गेले दोन ते तीन वर्षे पाच ते सहा कोटी रुपये खर्चून काम सुरू असून ते सध्या पूर्णत्वास आले आहे. सद्यस्थितीत शहरातील कोरोना रुग्णांसाठी ते सुरू करता येऊ शकते, सांगली जिल्ह्यात व तासगाव शहरासह तालुक्यात कोरोनाबाधीत रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांसाठी बेड ची व्यवस्था होत नसल्याने तासगांव शहरातील कस्तुरबा गांधी दवाखाना लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत कोव्हिड रुग्णांसाठी मोफत सेवेसाठी हॉस्पिटल सुरु करावे यासाठी तासगांव शहर काँग्रेस, शिवसेना,संभाजी ब्रिगेड, माहिती अधिकार चे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे व तासगाव शहरातील विविध सामाजिक संघटना यांनी खूप दिवसांपासून नूतन इमारतीमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्यात यावे यासाठी ची मागणी लावून धरली आहे. सदरचे काम नोबेल प्रा.ली. कंपनीकडे असून ते काम सत्ताधारी गटातील एका वजनदार मोठ्या नगरसेवकाने घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच त्या ठेकेदाराने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले असून सदरचे इमारतीचे काम पूर्ण झाले असून फक्त प्लंबिंग व लाईट फिटिंग चे काम बाकी आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते महादेवनाना पाटील शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील व शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, शिवसेना नेते अरुण नाना खरमाटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अमोल कदम, रवी शेठ साळुंखे, शरद शेळके, यांनी तासगाव शहरातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सोबत घेऊन सदरची बाब निदर्शनास आणून दिली यावेळी त्यांनी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील व इंजिनियर नदाफ यांना समक्ष नूतन इमारतीमध्ये बोलावून घेऊन येते लवकरात लवकर सर्व सामान्य नागरिक यांच्यासाठी मोफत उपचारासाठी कोव्हीड सेंटर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी तातडीने हॉस्पिटल सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या असताना सुद्धा जाणून-बुजून चालढकलपणा करीत राजकारण करीत असल्याचा व तासगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचारापासून वंचित ठेवण्याचा आरोप सत्ताधारी गटावर केलेला आहे.सदरच्या जुन्या कस्तुरबा रुग्णालय मध्ये शासकीय स्टाफ सुद्धा मंजूर असून सदर चे रुग्णालय तात्पुरते छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये सध्या कार्यरत आहे.यावेळी बोलताना सर्वपक्षीय नेते म्हणाले की आम्हाला या संदर्भात कोणतेही राजकारण करायचे नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांचा उपचाराविना जीव तडफडत असून कित्येक नागरिक उपचाराविना मृत्यू पावल्याची घटना शहरात घडली आहे नागरिकांना उपचारासाठी पैसे नसल्याने घरीच उपचार नागरिक घेत असून त्यांची उपचाराविना फरपट होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे तरी आठ ते दहा दिवसांमध्ये सदरचे कस्तुरबा रुग्णालय सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांना भेटण्यासाठी सदर सर्वपक्षीय शिष्टमंडळ सांगली येथे कस्तुरबा रुग्णालयाच्या नूतन इमारतीमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या संदर्भात चे निवेदन देण्यात आले आहे यावेळी तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव पाटील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद शेळके , शिवसेनेचे नेते अरुणनाना खरमाटे,माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव शिवसेना शहरप्रमुख संजय दाजी चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे, महेश पाटील, संभाजी ब्रिगेड ची तालुकाध्यक्ष अमोल कदम इ. उपस्थित होते. तरी तासगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुख तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी तातडीचे आदेश देऊन येत्या आठवडाभरात कस्तुरबा रुग्णालय नूतन इमारतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या साठी १०० बेडचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सहित कोव्हिड हॉस्पिटल सुरू करायच्या सूचना द्याव्यात अशी अपेक्षा तासगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत. हॉस्पिटल सुरू करण्यासाठीची जी काही मदत लागेल ते पालकमंत्री ना.जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम करतील सध्या कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एका विचाराने सदरचे नूतन कस्तुरबा रुग्णालय सुरु करून तासगावकर नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता तासगावकर नागरिकांच्यातून जोर धरू लागली आहे.
*चौकट*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव शहर अध्यक्ष एड. गजानन खुजट यांच्याशी कस्तुरबा रुग्णालय तातडीने सुरु करण्या संदर्भात संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांचे सोबत आढावा बैठकीमध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी हा विषय उपस्थित केला होता. यावेळी तहसीलदार व मुख्याधिकारी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे व माहिती अधिकाराचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी या बाबतीत हॉस्पिटल सुरू होण्याच्या संदर्भात मागणी केली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी सो सांगली यांना तातडीने कस्तुरबा रुग्णालय नूतन इमारतीमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून प्रसंगी ज्यादाचे ४ ठेकेदार नियुक्त करून आठ ते दहा दिवसात काम पूर्ण करून तेथे तातडीने रुग्णालय सुरू करण्याची सूचना दिल्याची माहिती एॅड.खुजट यांनी दैनिक जनमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.