परंडा ( दि ८ मे) उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा संसर्ग दिवसेन् दिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखन्या साठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने दि ८ मे ते १३ मे पर्यंत संपुर्ण उस्मानाबाद जिल्हात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .
या जनता कर्फ्यू काळात दवाखाने,मेडीकल,चष्मा दुकान शासकीय विमा कार्यालय यांना पुर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .
तर सर्व अस्थापणे,शहर हद्दीतील पेट्रोल पंप पुर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या अनुशंगाने परंडा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूचीची महसुल,पोलिस, नगरपरिषद प्रशासनाने कडक अमल बाजावणी सुरू केली असून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे,नायब तहसिलदार मीलींद गायकवाड,नायब तहसिलदार गणेश सुपे,नायब तहसिलदार सुजित वाबळे,व नगर परिषद यांच्या पथकाने जनता कर्फ्यू आदेशाचे उलंघन करणाऱ्यां नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली . कोरोना चा संसर्ग परंडा शहरासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने रुग्णास अडमीट करुन घेताना आरोग्य यंत्रनेस मोठी कसरत करावी लागत आहे.अशी भयान परिस्थीती तालुक्यातनिर्माण झाली आहे . दि८ मे पर्यत परंडा तालूक्यात कोरोनाचे ४९४ रुग्ण आसुन परंडा उप जिल्हा रुग्णालयात ६० रूग्णावर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह येथील कोवीड सेंटर मध्ये ६९ रुग्णावर तर संत मीरा स्कुल येथील कोवीड सेंटर मध्ये ५५ अश्या एकुन १८९ रुग्णावर उपचार सुरू असुन ३०५ रुग्णावर गृह विलगीकरण करून अरोग्य विभाच्या वतीने उपचार करण्यात येत आहेत.तर १२ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे
कोरोना व सारी रुग्ण मुत्यूच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज पर्यंत ९८ रूग्णांचा कारोना मुळे तर सारी मुळे १३ असे एकुन १११ रूग्णांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे .दि ७ मे रोजी सायंकाळी ३ रुग्णाचा मुत्यु झाला या मध्ये देवगाव खुर्द,मलकापुर,सोनारी येथील रूग्णाचा समावेश आहे तर दि ८ रोजी सकाळी कंडारी येथील एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे .
परंडा तालूक्यातील १०गावे मागील तीन दिवसा पूर्वी हॉट स्पॉट झोनमध्ये होती त्यात भर पडुन तीन दिवसात अनखी६गवे हॉट स्पॉट झोनमध्ये आली असुन परंडा तालुक्यातील एकुन १६गावे हॉट स्पॉट झोन झाली आहेत.या मुळे अरोग्य विभावर मोठा तान आला आहे.
चौकट..नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनाचे काटेकोर पालन करावे…
तालुक्यात कीरोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी तालुक्यातील प्रत्यक नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सुरक्षीता बाळगत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे
अहवाहान पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी तालुक्यातील नागरीकांना केले आहे.