उद्याच अधिसूचना काढण्याच्या सूचना, खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती
उस्मानाबाद -जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाईच्या प्रमाणात पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याचा मार्ग मोकळा झाला असून उद्याच अधिसूचना काढण्याच्या सूचना देण्यात आल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांना (दि.२५ ऑगस्ट) रोजी मुंबई भेटीच्या दरम्यान मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे पीक नुकसानी संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिकचा पावसाने खंड पडल्यामुळे खरिपाची पीके (सोयाबीन,उडीद, मूग आदी पिके) वाळली आहेत. महसूल, कृषी विभाग व पीक विमा प्रतिनिधी मार्फत चाचणी प्रयोग केली केले असून ५०% पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे विमा कंपनीने मान्य केले नव्हते. परंतु हि समिती पाच सदस्यांची आहे. व विमा प्रतिनिधीना कृषी विभागाची तांत्रिक माहिती नाही त्यांचे म्हणे नाकारले व महसूल व कृषी विभागाने केले पंचनामे व ५०% पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे मान्य केले आहे.
पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार आहे. याबाबत ची अधिसूचना काढण्याचा ठराव सर्वानुमते पास झाला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सदरील बैठकीस आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बिराजदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, विमा प्रतिनिधी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.