पोलीस निरीक्षक हे प्रमुख पदच रिक्त
पारा (राहुल शेळके ):उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे वाशी येथे अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे पोलीस कर्मचाऱयांवर कामाचा ताण पडतं असून याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.
वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत ईट व पारा असे दोन औट पोस्ट असून सरमकुंडी, वाशी, मांडवा व पारगाव असे चार बिट असून 70गावे या पोलीस स्टेशन अंतर्गत येतात. या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,दोन पोलीस उपनिरीक्षक,62 कर्मचारी मंजूर पदे आहेत. या ठिकाणी पोलीस निरीक्षक हे मुख्यच पद रिक्त आहे.राहिलेल्या 42कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचारी उपविभागीय पोलीस कार्यालयाला सलंग्न असतात.एक कोर्ट ड्युटी वर तर चालक चार आहेत. या सर्व कर्मचाऱयांवर रिकाम्या जागांचा ताण पडतं असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष घालून लवकरात लवकर या ठाण्याची पोलीस कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.