माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मुंबई येथे सत्कार
सलगरा,दि.१(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील सुपुत्र योगेश केदार यांची देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. ३ लाख २४ हजार कोटी रुपये बजेट असलेले हे महामंडळ असून देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन हमी भावाने खरेदी करत असते. सध्याच्या शेतकरी आंदोलनामुळे या महामंडळाची चर्चा सुद्धा मोठ्याप्रमाणावर होत असते. त्या मुळे नव्याने सल्लागार समिती नेमण्यात आली आहे, तुळजापूर तालुक्यातील अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाला केंद्र सरकार ने अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली आहे.
हे महामंडळ देशातील गरीब कुटुंबांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. रेशनिंग तसेच अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत संपूर्ण देशात स्वस्त तांदूळ आणि गहू पुरवठा हे महामंडळ करत असते. त्याच बरोबर मध्यान्ह शालेय पोषण आहारा साठी सुद्धा या महामंडळाकडून राज्य सरकार कडे धान्य पुरवठा केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर अन्नधान्य उत्पादक आणि ग्राहक यांचे हित रक्षण करणे, तसेच अन्न धान्य खरेदी, त्याची साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी धोरणे आखणे व केंद्र सरकार ला सल्ला देणे असे या समितीचे मुख्य उद्देश आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय खाद्य महामंडळाच्या वखारी आहेत.
राष्ट्रीय अन्न महामंडळावर नियुक्ती झाल्याने त्यांचा नवी मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, अखिल भारतीय छावा संघटनेचे मनोज अण्णा मोरे, प्रतापसिंह कांचन व सचिन फोलाने हे उपस्थित होते.