back to top
Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यामाजी पोलीस पाटील करत होता तस्करी ,वाघ/बिबट्या ची तीन नखे,एका वन्य प्राण्यांचे...

माजी पोलीस पाटील करत होता तस्करी ,वाघ/बिबट्या ची तीन नखे,एका वन्य प्राण्यांचे काळीज व एक बंदूक सह अटक

 

राधानगरी( प्रतिनिधी) -आज 3.9.2021 रोजी सकाळी 12 वाजता वनविभागाच्या एका धडाक्याच्या कारवाई मध्ये  मौजे शिवडाव , ता.बुडरगड , जिल्हा कोल्हापूर , येथे  माजी पोलीस पाटील वसंत महादेव वासकर वय 55 , याच्या राहत्या घरावर मिळालेल्या गुप्त माहितीवरून छापा मारण्यात आला.सदर छाप्यात त्याच्या घरात 3 वाघ/बिबट नखे व एका वन्य प्राण्यांचे काळीज हे हस्तगत करण्यात आले. ह्या शिवाय शिकारीसाठी वापरलेली बंदूक ही हस्तगत करण्यात आली आहे.तसेच आरोपी- वसंत महादेव वासकर यास देखील अटक करण्यात आलेली आहे.आरोपी याने तीन नख्या घरातील स्वयंपाक घरात हळदीच्या डब्यात (3)तीन नख्या लपवून ठेवले होते.वन्यप्राण्यांचे काळीज त्याने फ्रिज मध्ये लपवून ठेवले होते.720 ग्राम मांस, बारा बोअर बंदूक, 13 जिवंत काडतुस हे हस्तगत केले आहे, व तीन बिबट्या नखे.त्याच्या घरात एक बंदूक हे जप्त करण्यात आली आहे.सदर आरोपी ह्याने ह्यापूर्वी असे अनेक कारनामे जंगलात यापूर्वी केल्याची चर्चा आहे. ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वन संरक्षक डॉ व्ही क्लेमेंट बेन व उपवनसंरक्षक आर.आर.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई मध्ये सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल फिरते पथक युवराज पाटील, वनक्षेत्रपाल अशोक वाडे, किशोर आहेर, सुनील खोत, मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक सांगली अजितकुमार पाटील व  वनविभागाचे इतर वनपाल  संदीप शिंदे, वनरक्षक जॉन्सन डिसोझा, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले हे सहभागी झाले होते.अधिक तपास सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments