back to top
Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्या17 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत.”

17 वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी अटकेत.”

परंडा :- १७ वर्षापासून हवा असलेला आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.वडगांव (नळी), ता. भुम येथील भावड्या उध्दव काळे याचा  भुम पो.ठा. गु.र.क्र. 37 / 2004 मध्ये सहभाग असल्याने पोलीस त्याचा शोध घेत असल्याने गेली 17 वर्षे तो पोलीसांना हुलकावनी देत होता. गोपनीय माहिती आधारे परंडा पो. ठा. च्या पोनि- श्री. सुनिल गीड्डे यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- कळसाईन, पोना- घोळवे, पोकॉ- कोळेकर, सय्यद यांच्या पथकाने त्यास आज दि. 03 सप्टेंबर रोजी भुम तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. 


अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान 33 छापे.

उस्मानाबाद जिल्हा : काल दि. 02 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद पोलीस दलाने जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी मोहिम राबवून खालील प्रमाणे कारवाया केल्या. यात 305 लि.  अवैध गावठी मद्य तर देशी- विदेशी 146 बाटल्या मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 33 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.

1) तुळजापूर पो.ठा. च्या पथकास अपसिंगा ग्रामस्थ- लक्ष्मी कांबळे या  15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

2) कळंब पो.ठा. च्या पथकास इंदीरानगर परिसरात ललीता काळे या 10 लि. गावठी दारु, डिकसळ येथील श्रावणी काळे व कविता काळे या दोघी अनुक्रमे 10 व 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या, कळंब मार्केट यार्डात कमल पवार या 19 लि. गावठी दारु तर तानाबाई शिंदे या भोगजी येथे 20 लि. गावठी मद्य बाळगलेल्या आढळल्या.

3) मुरुम पो.ठा. च्या पथकास केसरजवळा येथे राजेश गायकवाड हे 7 लि. गावठी दारु बाळगलेले, चिंचोली (भु.) येथे अजित गायकवाड हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले तर दाळींब येथे जगदीश पवार हे देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले आढळले.

4) शिराढोन पो.ठा. च्या पथकास लोहटा (पु.) येथे सुरज भोगले हे 180 मी.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या 8 बाटल्या, रांजणी येथे अशपाक कुरेशी हे देशी दारुच्या 8 बाटल्या तर दाबा येथे रावसाहेब टेळे हे देशी दारुच्या 28 बाटल्या बाळगलेले आढळले.

5) परंडा पो.ठा. च्या पथकास ईडा येथे अमोल कचरु भोसले हे 180 मी.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 13 बाटल्या तर सुमित नलवडे हे 4 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

6) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास जाहगीरदारवाडी तांडा येथे आंबादास राठोड हे देशी दारुच्या 24 बाटल्या बाळगलेले तर उज्वला पवार या महामार्गावरील तेरणा तिठा परिसरात 7 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

7) येरमाळा पो.ठा. च्या पथकास सापनाई येथे समाधान पायाळ हे 5 लि. गावठी दारु बाळगलेले तर चोराखळी येथे सिताबाई काळे या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेल्या आढळल्या.

8) भुम पो.ठा. च्या पथकास वालवड येथे सचिन मोहिते हे देशी दारुच्या  11 बाटल्या बाळगलेले तर गोरमाळा फाटा येथे लताबाई पवार या 5 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

9) उमरगा पो.ठा. च्या पथकास तुरोरी येथे शिवाबाई लिंबोळे या 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर गोपीनाथ राठोड हे पळसगाव तांडा येथे 20 लि. गावठी दारु बाळगलेले तर जकेकुरवाडी येथे बालाजी चव्हाण हे 18 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

10) ढोकी पो.ठा. च्या पथकास बुकनवाडी येथे शंकर शिंदे हे 10 लि. व गवणा शिंदे 15 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

11) लोहार पो.ठा. च्या पथकास परशुराम गणागुणी हे जेवळी (द.) येथे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

12) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास अणदुर येथील दयानंद सोनवने हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

13) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास जुने बस आगार परिसरात शितल काळे या 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

14) वाशी पो.ठा. च्या पथकास बारलोणी येथे चंदाबाई शिंदे या 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

15) तामलवाडी पो.ठा. च्या पथकास वडगाव (का.) येथील ज्ञानेश्वर भोसले हे देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले आढळले.

16) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास चिलवडी येथे सुनिल दिंडोळे हे 15 लि. तर महेश हाके हे येडशी येथे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

17) बेंबळी पो.ठा. च्या पथकास नांदुर्गा येथे अजित बनसोडे हे देशी दारुच्या 16 बाटल्या बाळगलेले आढळले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments