back to top
Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याऑनलाईन फसवणुकीतील आरोपी झारखंड राज्यातून अटकेत.

ऑनलाईन फसवणुकीतील आरोपी झारखंड राज्यातून अटकेत.

 

सायबर पोलीस ठाणे उस्मानाबाद : ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीला झारखंड राज्यातून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले असून याबाबत अधिक वृत्त असे की, तुमच्या युपीआय ॲपलिकेशनची केवायसी करायची आहे. असा कॉल परंडा येथील जाकीर मुल्ला यांना आल्याने त्यांनी समोरील अज्ञाताने सांगीतल्याप्रमाणे आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘क्वीकसपोर्ट’ हे ॲपलिकेशन घेउन आपल्या युपीआय खात्यावर व्यवहार केले. दरम्यान समोरील अज्ञाताने या ‘क्वीकसपोर्ट’ ॲपलिकेशनद्वारे मुल्ला यांच्या युपीआय खात्याची- बँक खात्याची माहिती व पासवर्ड जाणून घेउन त्यांच्या खात्यातील 1,62,957 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत केली. आपली फसवणूक झाल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आल्याने त्यांनी परंडा पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गु.र.क्र. 165 / 2020 नोंदवण्यात आला.

            पुढील तपासाकरीता उस्मानाबाद येथील सायबर पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. सायबर पोलीसांनी तांत्रीक माहिती गोळा केली असता हा गुन्हा मधुपूर, जि. देवघर, रा. झारखंड येथील मुर्शीद अन्सारी या 22 वर्षीय तरुणाने केला असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास परंडा पो.ठा. च्या सपोनि- श्री. ससाने, पोकॉ- मुलानी, विधाते यांचे पथक झारखंड येथे रवाना झाले होते. तब्बल 7 दिवस झारखंड राज्यात शोध घेउन नमुद आरोपीस अखेर दि. 01.09.2021 रोजी ताब्यात घेउन उस्मानाबाद येथे आनले असून उर्वरीत तपास सायबर पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.


रात्रगस्तीदरम्यान 15 भ्रमणध्वनींसह संशयीत ताब्यात.”



अंबी पोलीस ठाणे : अंबी पो.ठा च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर यांसह पोहेकॉ- मुळे, धावडे, पोकॉ- आडसूळ यांचे पथक आज दि. 7 सप्टेंबर रोजी पहाटे रात्रगस्तीस असतांना अंबी येथे एक पुरुष रस्त्यात दिसला. पोलीसांनी त्यास हटकले असता त्याचे नाव सुभाष उत्तम राऊत, रा. खांबेवाडी, ता. करमाळा असल्याचे समजले. संशयावरुन पोलीसांनी त्याच्या पिशवीची झडती घेतली असता आत 14 स्मार्टफोन व 1 फिचर फोन असे एकुण 15 भ्रमणध्वनी आढळले. या भ्रमणध्वनींच्या मालकी- ताबा विषयक तो समाधानकारक माहिती देत नसल्याने त्यास अटक करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122, 124 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्या भ्रमणध्वनींच्या आयएमईआय क्रमांकाद्वारे मुळ मालकांचा शोध घेतला जाणार असुन या कामी उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याची मदत घेतली जाणार आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments