उस्मानाबाद ( कुंदन शिंदे)
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी थोरा मोठ्यांपासून सगळेच तयारी करत आहेत.उद्या बाप्पाचे आगमन होणार असल्याने नागरिकांनी गणरायाला लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे शहरातील बाजारपेठात उत्सवानिमित्त आकर्षक विद्युतमाळा आणि विविध फुलांच्या माळांनी शहरातील दुकाने सजली आहेत, गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणपती बाप्पाची मूर्ती आवर्जून बसविली जाते. त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते.
सजावटीसाठी लागणारे झालर आकाराचे कापडातील असणारी कमान, विविध आकाराचे फुले,माळा, गळ्यातील हार आदी साहित्य विक्रीसाठी आले आहे.
गणरायाचे आगमन होताच त्या पाठोपाठ गौरी यांचे सुध्दा आगमन होते बाजारात गौरीच्या आकर्षक मूर्त्या बाजारात दाखल झाला आहेत महिलांनी मूर्त्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली तसेच गौरीला लागणाऱ्या साहित्याचे खरेदी करण्यात मग्न होत्या
गेल्या वर्षी कोरोना मुळे गणेशोत्सव साधा पद्धतीने साजरा करण्यात आला होता कोरोनाची दुसऱ्या लाट ओसरत आहे कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहे यामुळे व्यापारी वर्गातून मोठ्या व्यवसाय होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत
उस्मानाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ मारवाडी गल्ली,नेहरू चौक या भागात आहे शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सणाला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी या भागात येतात सनासुदीच्या काळात या भागात वाहतूक कोंडी होते नगरपालिकेने यासाठी या नागरिकांसाठी कोठेही पार्किंग करण्याची सुविधा केली नाही वाहतूक कोंडी मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणाने या भागात पार्किंग ची व्यवस्था करण्याची मागणी नागिकांमधून होत आहे.