वारणा दूध संघ उत्पादकांच्या जनावरांसाठी ५० हजारांचे विमा संरक्षण देणार-अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची सभेत माहीती
‘ We Warana ‘ या नवीन ॲपचा शुभारंभ –
वारणानगर – वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी ५० हजारांची विमा सरंक्षण योजना राबविणार असून म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडी संगोपणासाठी ३० हजार रूपये अनुदान देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी सभेत बोलताना केली.तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाची ५३ वी ऑनलाईन वार्षिक सभा वारणा शिक्षण संकुलात झाली दूध उत्पादक शेतकरी व दूध संघ यांच्यातील समन्वयासाठी ‘ We Warana App ” या वारणा दूध संघाच्या नवीन अॅपचे उद़घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले.आमदार कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने शेतकरी उत्पादकांचे कायमच हित पाहीले उत्पादकांच्या दोन जनावरांसाठी विमा कवच योजना राबाविणार असून दूध उत्पादकांचे प्रती जनावर ५०० रू व संघ ५०० रु अशा १००० रु विमा रक्कमेतून जनावरे दगावल्यास प्रती जनावरास ५० हजार रूपये संरक्षण देणार आहे दूध उत्पादकानी म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडीचे संगोपन करून ती रेडी पहिल्या वेत्तास व्याल्यास त्यापोटी ३० हजार रू. व दुसऱ्या वेत्तास १५ हजार तर देशी गायीस संगोपन केल्यास १५ व ७ हजार रू दोन वेत्तास अनुदान देण्यात येणार आहे दूध उत्पादक शेतकरी व संघ यांच्यातील समन्वयासाठी संघाने नवीन अॅपची संकल्पना आणली असून उत्पादकांच्या तक्रारीचे निरसन,पशूवैद्यकीय सेवे बरोबर इतर सुविधा व माहिती मिळणार आहे.वारणा दूध संघाने कोरोनाच्या महामारीत अहवाल सालात ९३४ कोटीची वार्षिक उलाढाल करून ६४ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला आहे पावडर व बटरमध्ये मोठे नुकसान होऊन देखील १३० कोटी रूपये बँक कर्जाची परतफेड केली दुग्ध पदार्थाच्या विक्री व्यवस्थेत बदल करुन रिलायन्स,डी-मार्ट, शेतकरी संघ यांच्याशी करार करणेत आल्याने वारणाची दूध व दुग्ध उत्पादने ग्राहकापर्यंत पोहचवण्याचे काम संघाने केले असून भारतीय सैन्य दल,रेल्वे,बिहार राज्य,आदिवाशी शाळानां तूप,दूध, पावडरची मागणी वाढली आहे बोर्नव्हिटा या कंपनीची मागणी वाढल्याने माल्टेड फूडची क्षमता वाढवण्यासाठी ३० कोटी रूपयांचा नवा प्रकल्प डिसेंबर अखेर सुरु करण्यात येणार असून परिसरातील १५० लोकांना रोजगार मिळणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून अॅग्रीकल्चरल डेअरी डिप्लोमा व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कोरे यानी सांगीतले.
संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी नोटीस वाचन व श्रध्दांजलीचा ठराव मांडला सभेपूढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केलेत.व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव,संघाचे सर्व संचालक, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमितकुमार उपस्थित होते.शीतल बसरे व राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५३ व्या वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष व आमदार डॉ.विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले यावेड़ी संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर,सर्व संचालक मंडळ,कारखा न्याचे प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील आदी