उस्मानाबाद स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई
परंडा (भजनदास गुडे)
( दि २५ )मांडूळची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा उस्माबाद स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून परंडा तालुक्यातील १,नाशीक येथील ४ व उस्मानाबाद येथील १ असे ६ आरोपींना दि २४ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक करून मांडूळा सह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे . मांडूळाची तस्करी करणारी टोळी मांडूळ घेऊन नाशीक येथून उस्मानाबाद येथे येत असल्याची माहिती काडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा लाऊन पो नि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोनि निलंगेकर,पोउपनी माने पो हवालदार जगदाळे,पोना चव्हाण,पोका ढगारे,पोका ठाकूर,पोका कोळी,चालक पोहेका अरब यांच्या पथकाने दि २४ सप्टेबर रोजी रात्री ७ – ३० ते ८ वाजेच्या दरम्यान उस्मानाबाद महामार्गाच्या बायपास वर आरोपी दिपक एकनाथ शिंदे,विजय देवराम कटारणवरे,संदिप बाळासाहेब लोखंडे,सुशांत बाळासाहेब गायकवाड,राहणार नाशीक व परंडा तालुक्यातील कुभेकळ येथील अब्दुल आझम पटेल रा.कुंभेफळ ता परंडा,रामा भीमा कांबळे रा बेगडा उस्मानाबाद यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील साडेतीन कीलो वजनाचा मांडूळ किंमत चाळीस लाख व एक एर्टीगा गाडी किंमत सात लाख रु असे एकूण ४७ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थनिक गुन्हा शाखेचे पोलिस उप निरिक्षक माने यांच्या फिर्यादी वरून सर्व आरोपी विरूध्द उस्मानाबाद च्या आनंदनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.