back to top
Friday, December 6, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यामातंग समाजातील सुधाकर शेंडगेंची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व कुटुंबांचे पुनर्वसन झाल्याशिवाय...

मातंग समाजातील सुधाकर शेंडगेंची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व कुटुंबांचे पुनर्वसन झाल्याशिवाय शांत बसणार नाही:- अजिनाथ राऊत

 

जवळा नि दि 13 प्रतिनिधी

मौजे सांगवी काटी ता तुळजापुर जि उस्मानाबाद येथील मातंग समाजातील बांधकाम मिस्त्री सुधाकर शेंडगे यांच्या हत्येप्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असुन या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक परांडा यांचे मार्फत महामहिम राज्यपाल महोदय यांना कायदेशीर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

                   निवेदनात म्हटले आहे की तामलवाडी पोलीसात दाखल गुरनं 195/2021 मधील आरोपींकडे सुधाकर शेंडगे यांचे बांधकामाचे राहिलेले केवळ 7 ते 8 हजार रु मागीतल्याच्या कारणावरुन आरोपींनी सुधाकर शेंडगे व त्यांच्या पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करुन सुधाकर शेंडगे यांच्या डोक्यात लोखंडी फावडे (खोऱ्याने) मारुन गंभीर जखमी केले होते. सदर प्रकरणी सांगवी काटी ता तुळजापुर सुरेखा शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी ता. तुळजापूर जि उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये दि. 30/10/2021 रोजी गुरनं 195/2021 कलम भादवी 307,323 504,506,34 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2) va, 3(1) r,s, कलमान्वये गुन्हा दाखल झाला असुन तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर हे करत आहेत. सुधाकर शेंडगे यांचे डोक्यास गंभीर मारहाण दुखापत झाल्यामुळे त्यांचेवर तुळजापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करुन पुढील उपचार सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे ICU विभागात चालु होते. उपचारादरम्यान अखेर त्यांचा सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुधाकर शेंडगे यांनी केवळ बांधकामांचे राहिलेले पैसे मागीतल्यामुळे त्यांचे डोक्यात लोखंडी फावड्याडे गंभीर मारहाण करुन त्यांची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी कायदेशीर विविध मागण्यांचे निवेदन परांड्याचे तहसिलदार रेणुकादास देवणीकर तसेच पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे मार्फत राज्यपालांना देण्यात आले आहे निवेदनातील मागण्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर दि 25 जानेवारी 2022 रोजी अमरण उपोषण करणार इशारा देण्यात आला आहे.

               निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, परांडा तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, परांडा तालुका संघटक आशोक चव्हाण, समता सैनिक दलाचे परंडा तालुकाध्यक्ष आश्रू वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले, अक्षय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments