उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.१३
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय म्हणजे एक ज्ञानमंदीर असून या ज्ञानमंदीरातून सुसंस्कारित विद्यार्थी घडवावेत त्यातूनच संस्कारित माणसं घडतील फुले,शाहू,आंबेडकर व संतांचा विचार हाच डाॅ.बापूजींचा विचार आहे डाॅ,बापुजी साळुंखे यांचा त्याग डोळ्यासमोर ठेवून आजच्या शिक्षकांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधक बनवावे व विद्यार्थ्यांची ज्ञानदृष्टी वाढवावी असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अतिथी गृहाचे उदघाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना १३नोव्हेंबर रोजी, प्राचार्य अभयकुमार साळुंखे(कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर)यांनी केले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी मकरंद राजेनिंबाळकर(नगराध्यक्ष न.प.उस्मानाबाद)हे होते.यावेळी कौस्तुभ गावडे(सी.ई.ओ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,) प्राचार्य व मराठवाडा विभाग प्रमुख डाॅ.जयसिंगराव देशमुख,श्रीराम साळुंखे( कोल्हापूर विभाग प्रमुख),माजी प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,नानासाहेब पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी डाॅ.बापुजी साळुंखे,संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे,श्री विवेकानंद यांचे प्रतिमांचे पुजन केले.प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.पुढे बोलतांना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या ईमारतीची उभारणी करतांना उस्मानाबाद मधील अनेक दानशुरांनी एक एक दगड प्रेमाने दिला आणि हे महाविद्यालय उभारले त्यामुळे हे महाविद्यालय विद्यापीठात व संस्थेत नाव टिकवून आहे.आज कोरोना काळात माणुसकी हरवली आहे पुंन्हा चांगली संस्कृती उभारली पाहिजे,आजचे विद्यार्थी इंटरनेटचा वापर करत आहेत त्यामुळे आजच्या शिक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे.त्यामुळे शिक्षकांनी तयारी करायला हवी व आपले ज्ञान बळकट करायला हवे.अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले की,आपले महाविद्यालय नेहमीच नाविन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम राबवत असते आपणास सहकार्य लागत असेल तर आंम्ही आपल्या पाठीशी आहोत.भविष्यात आपधास सहकार्य करू.प्रास्ताविक करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,या महाविद्यालयात के.जी.टू पी.जी शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी हायस्कूल सुरू करण्याची गरज आहे.या महाविद्यालयात संशोधन सेंटर झेप घेत आहे.त्याचा फायदा भविष्यात परिसरातील शेतक—यांना होईल.यावेळी नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख,प्र.प्राचार्य पवार,प्र.प्राचार्य शिंदे उपस्थित होते.यावेळी मराठवाडा येथील विविध शाखेतून मुख्याध्यापक,माजी प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.सूञसंचालन प्रा.वैभव आगळे यांनी केले आभार प्रा.केशव क्षीरसागर यांनी मानले.