सलगरा, (प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणारा श्री.खंडोबा याञा पालखी सोहळा महोत्सव यावर्षी ही साजरा करण्यात येणार असल्याचे याञा कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यातील दि. ०१ ते १५ तारखेच्या दरम्यान यात्रा व पालखी उत्सव साजरा होणार असून याकरिता किलज ग्रामपंचायतने सहकार्य करावे असे आवाहन याञा कमिटीने ग्रामपंचायतकडे केले आहे. यासाठी श्रमदान व साफसफाई करून ज्या मार्गावर पालखी मार्गस्थ होणार आहे त्या ठिकाणी तात्पुरते स्वरूपाचे लाईटचे फोकस लावून किंवा दिवा बत्ती करून सदर पालखी उत्सवाच्या दरम्यान आपल्याकडील ग्रामस्थांना सहकार्य करण्यास आपल्या माध्यमातून आवाहन करावे तसेच स्वतः व ग्रामपंचायत सर्व सदस्य हजर राहून सहकार्य करावे. सदरचा पालखी उत्सव शांततेत पार पाडण्यात आम्हाला सहकार्य करावे असे खंडोबा याञा उत्सव कमिटीने किलज ग्रामपंचायतला आवाहन केले आहे, तसेच उत्सवा दरम्यान लाईटच्या समस्येबाबत विद्युत मंडळास अगोदरच पूर्व कल्पना द्यावी गावातील गटारे स्वच्छ करावेत असेही कळविण्यात आले आहे.