उस्मानाबाद:- जिल्हा काँग्रेस कार्यालय गांधी भवन उस्मानाबाद येथे केंद्रसरकरच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेले निरीक्षक माजी आमदार मा.विश्वनाथ चाकोते, सहनिरीक्षक डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा जनजागरण अभियान रथाची पूजा करून व रथाला हिरवा झेंडा दाखहून शुभारंभ करण्यात आला.
या वेळी मार्गदर्शन करताना चाकोते यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगून काँग्रेस व भाजपा सरकारमधील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यामधील फरक मांडला
काँग्रेस झोपडीतील गरीब माणूस केंद्र बिंदू समजून योजना अंमलात आणत होती, तर भाजपा सरकार अदानी ,अंबानी याना समोर ठेहून सरकार चालवत असल्याचा आरोप केला,
डिझेल, पेट्रोल,गॅस,शेती औजारे,खाद्यपदार्थ, मशनरी,यांच्या किमती काँग्रेसच्या काळातील किमतीशी तुलना केली तर तीन पट किमती वाढल्या असल्यामुळे जनतेचे बजेट कोलमडले असल्याचे दिसून येत आहे.
या वेळी सह निरीक्षक डॉ रॅपनवाड यांनीही मार्गदर्शन केले काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला जाग करावे असे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून जनजागरण अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात यशस्वी करू असे आश्वासन दिले.
निरीक्षकांनी प्रत्येक तालुकाध्यक्ष यांचेकडून तालुकानिहाय आढावा घेहून अभियान प्रत्येक जि.प गट आणि गणात पोहचविण्याचे नियोजन करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने कार्याध्यक्ष खलील सय्यद उपाध्यक्ष भागवत धस प्रशांत पाटील तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे ॲड. हनुमंत वाघमोडे पांडूरंग कुंभार बाळासाहेब गपाट सेवा दल अध्यक्ष विलास शाळू सचिव जावेद काझी ॲड. विश्वजीत शिंदे शामराव भोसले प्रणित डिकले आनंद घोगरे मिलिंद गोवर्धन गोविंद पाटील ॲड.राहूल लोखंडे ॲड.अतुल देशमुख पोपट अंबिरकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले कार्यक्रमास जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते