लोहारा तालुक्यातील घटना; गुन्हा दाखल
लोहारा पोलीस ठाणे :
उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीच्या अनेक घटना घडत आहेत. प्रशासन जनजागृती करत असून देखील अश्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना लोहारा तालुक्यात घडली आहे
एका अनोळखी व्यक्तीने, “मी उस्मानाबाद येथे कृषी अधिकारी असुन तुमचे सिंचन साहित्याचे अनुदान आले असल्याने त्यासाठी तुम्हाला 50,000 ₹ चलन भरावे लागेल, अनुदान मिळाल्यास तुमच्या चलनाची रक्कम तुम्हाला परत मिळेल.” असे बेंडकाळ ग्रामस्थ- राम साधु कदम, वय 72 वर्षे यांना दि. 18.11.2021 रोजी बतावणी केली. यावर काहीएक विचार न करता राम कदम यांनी त्याच्या कारमध्ये बसून त्या अनोळखी व्यक्तीस आपल्या घरी नेउन नमूद चलनाची रक्कम त्या व्यक्तीस दिली. यावर त्या व्यक्तीने ती रक्कम ऑनलाईन भरण्याची शाश्वती देउन अनुदानाच्या रकमेचा धनादेश उद्या घेउन येण्याचे कदम यांना आश्वासीत केले व आपला फोन क्रमांक कदम यांना देउन निघून गेला. यानंतर कदम यांनी त्या व्यक्तीस संपर्क साधले असता त्याचे प्रतीउत्तर येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या राम कदम यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 170, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.