उस्मानाबाद –
भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिसंक घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच शेतक-यांचे महावितरण काढून सक्तीने होत असलेल्या वीज तोडणीच्या विरोधात, पिक विमा न देता शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात तसेच पेट्रोल व डिझेल मधील करामध्ये कपात न केल्यामुळे सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, राजसिंहा राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, खंडेराव चौरे, ॲड नितीन भोसले, इंद्रजित देवकते, रामदास कोळगे, प्रदीप शिंदे,विजय शिंगाडे, पांडुरंग लाटे, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. या पार्श्वभूमीवर आनंद नगर पोलीस स्टेशन च्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तासभराच्या आतच हे आंदोलन आटोपते घेण्यात आले.