उस्मानाबाद जिल्ह्यात वाहतुकीला शिस्त लागावी तसेच अवैध वाहतूक करणे वाहतूक नियमाचे उल्लंघन करणे आदी कारणावरून ई- चालान प्रमाणालीद्वारे वाहन धारकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. १ डिसेंबर पासून या दंडात्मक नियमात सुधारणा करण्यात आली असून नियम मोडणाऱ्या वाहनावर दंड आकारला जाणार आहे.
मोटर वाहन सुधारणा अधिनियमांतर्गत ई – चालान दंडात्मक कार्यवाहीत सुधारणा करण्यात आली आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दुप्पटीने दंड आकारला जाणार आहे. विविध नियम व आकारण्यात आलेला दंड पुढील प्रमाणे आहे. यामध्ये नवीन दंडाची रक्कम दिलेली आहे. पोलिस आदेशाचे पालन न करणे प्रथम अपराध ५०० रुपये तर द्वितीय अपराध १५०० रुपये, अनाधिकृत वाहन चालक ५ हजार रुपये, विना लायसन्स वाहन चालविणे ५००० रुपये, परवाना संपूनही वाहन चालविणे ५००० रुपये, वाहनाची शर्यत लावणे प्रथम अपराध ५००० रुपये, द्वितीय अपराध १० हजार रुपये,विनाकारण हॉर्न वाजविणे प्रथम ५०० रुपये तर द्वितीय अपराध १५०० रुपये, विना विमा वाहन चालविणे प्रथम अपराध २ हजार रुपये तर द्वितीय अपराध ४ हजार रुपये, वेग मर्यादेचे उल्लंघन दुचाकी १ हजार रुप्ये, ट्रॅक्टर १५०० रुपये, हलकी वाहने ४ हजार रुपये , फॅन्सी नंबर प्लेट लावणे याबाबत प्रथम ५००, द्वितीय व त्यानंतर १५०० रुपये, विना हेल्मेट प्रथम ५००, द्वितीय व त्यानंतर १५०० रुपये, १६ वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविण्यास ५०००रुपये,अवैध प्रवासी वाहतूक ५००० रुपये, अवैध पीयूसीसी प्रथम ५०० रुपये व द्वितीय १५००० रुपये,वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे प्रथम दुचाकीसाठी एक हजार रुपये, तीनचाकी वाहनासाठी दोन हजार रुपये, जड वाहनासाठी चार हजार रुपये, द्वितीय अपराध चार हजार दंड आकारला जाणार आहे.