आटपाडी (अंकुश मुढे)
आटपाडी येथिल शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटारी व आर्मीचर चोरीप्रकरणी आटपाडीतील चंचलकुमार सिंह रा. मापटेमळा मुळ गाव बलना उत्तर प्रदेश, भाऊसाहेब श्रीमंत पाटील रा.गोंदिरा, निखिल राजेंद्र खरात. रा बोराटामळा, आटपाडी. दामोदर धनिराम वय. रा. मापटेमळा,मुळ गाव बलना उत्तर प्रदेश, रावसाहेब शिवाजी सागर, सागरमळा आटपाडी. पवनकुमार अशोक जाधव, विठ्ठलनगर.आटपाडी यांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की पो. कॉ. गावडे यांनी वरील आरोपी चंचल कुमार सिंह यास ताब्यात घेऊन तपास केला असता. भाऊसाहेब श्रीमंत पाटील व निखील राजेंद्र खरात यांच्या मदतीने वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले. चंचल कुमार, भाऊसाहेब पाटील, निखिल खरात या आरोपींना अटक करून अधिक तपास केला असता, वरील गुन्ह्याची कबुली देताना इलेक्ट्रीक मोटारी,पाण्यातील मोटारी व आर्मिचर आटपाडी येथील भंगार विक्रेते दामोदर धनीराम वय यांना विकल्याचे त्यांनी सांगितले भंगार विक्रेते दामोदर धनीराम वय यांना कौशल्याने अटक करून अधिक तपास केला असता. रावसाहेब शिवाजी सागर व पवन कुमार अशोक जाधव यांना त्याच मोटारी विकल्याचे कबुल केले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आर्मिचर व 9 इलेक्ट्रीक मोटारी असा एकूण एक लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपास कामी आरोपींना अटक करण्यात आली असून, आटपाडी तालुक्यातील शेतकरी यांच्या चोरीस गेलेल्या मोटारींचा व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे..