back to top
Saturday, October 12, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याशेतकरी चिंताग्रस्त ; बदलत्या वातावरणाचा सलगरा सह परिसरातील पिकांना फटका

शेतकरी चिंताग्रस्त ; बदलत्या वातावरणाचा सलगरा सह परिसरातील पिकांना फटका


सलगरा,दि.१८(प्रतिनिधी)

खरिपाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने पिकाची नासाडी केल्यानंतर रब्बीची पिके तरी चांगली येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र मागील पंधरवड्यापासून होत असलेल्या ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील , सलगरा, किलज, गंधोरा, वाणेगाव, वडगाव देव सह परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. हरभरा आणि ज्वारीवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने ही पीके मार खात आहेत.

दरम्यान मागील काही महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची पूर्णपणे वाट लागली असताना रब्बीच्या पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या वातावरणात सतत बदल होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.आता जोमात आलेली पीके गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण या मुळे ज्वारी व हरभरा पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या मुळे पिकांना रोगांची लागण झाली असून कितीही महागडी औषधे फवारणी केली तरी हा रोग लवकर जात नसल्याने ज्वारीचे व हरभऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

 सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, यामध्ये  शेतात हरभरा पीक वाढीच्या वेळेस असताना पिकाला मर येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत आहे. त्याच बरोबर हरभरा पिकावर बारीक अळ्या दिसून येत आहेत, पानांवर पांढरे डाग सुद्धा दिसत आहेत, त्या मुळे हरभरा पिकाला मर लागल्याने नुकसान होत आहे. याविषयी आम्हा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

 शेतकरी – लोमटे नागनाथ ज्ञानदेव


 सध्या ज्वारीवर अज्ञात रोगांचा / किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने या रोगांमुळे ज्वारीच्या पिकामध्ये जवळपास ३० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते, जर योग्यवेळी आणि योग्यपद्धतीने नियंत्रण केले तर नक्कीच या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविता येऊ शकते, ज्वारी पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत आहेत, या रोगांमुळे ज्वारीच्या पिकाचे नुकसान होत असल्याने उत्पादन कमी होण्याची भीती आहे. म्हणून या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

शेतकरी – लोमटे अभिजित चंद्रकांत


किड व्यवस्थापनाबाबत कृषी सहायक  संतोष रंदवे यांचे मार्गदर्शन

ज्वारी किड व्यवस्थापन – अमेरिकन लष्करी अळींवर नियंत्रण मिळविण्यासाठी १०-२० टक्के प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टिन बेन्झोएट पाच एसजी चार ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के, अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९ .५ टक्के, झेडसी पाच मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के , एस.सी. ४ मिली किंवा स्पायनोटोरम ११.७ एस. सी. पाच मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 


हरभरा किड व्यवस्थापन –  पहिली फवारणी साधारणता चाळीस ते पन्नास टक्के फुलोऱ्यावर हरभरा असताना, पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, कीड नियंत्रणाची वेळ निश्चित करण्यासाठी आठवड्यातून एक दोन वेळेस पिकाची बारकाईने पाहणी करून पानांवर बारीक बारीक पांढरे डाग दिसून येताच अथवा पिकाच्या एक मीटर लांब ओळीत १-२ अळ्या आढळून आल्यास अथवा ५ टक्के घाट्यावर अळीचा उपद्रव दिसून येताच एक हेक्टर क्षेत्रात ८-१० फेरोमोन (कामगंध) सापळे बांबूच्या सहाय्याने पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर अडकवून सलग २ ते ३ दिवस प्रत्येक सापळ्यात ८-१० पतंग येत असल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. पिक फुलोऱ्यात आणि घाटे भरताना अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य झाल्यास अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात . पेरणी बरोबर ज्वारीची दाणे मिसळली नसल्यास शेतात पिकाच्या उंचीपेक्षा अधिक उंच इंग्रजी (टी) आकाराच्या काठ्या पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे म्हणून रोवाव्यात . रासायनिक कीटकनाशकांची फवारणी / धुरळणी शक्यतो पट्टा पद्धतीने पिकाच्या १ ते १.५ मी. रुंद एका आड एक पट्ट्यावर करावी व राहिलेल्या पट्ट्यावर 5-7 दिवसांनी परत फवारणी करावी जेणेकरून परोपजिवी / परभक्षी किडींचे संवर्धन होऊन त्यांची कीड नियंत्रणास मदत होईल.

रासायनिक नियंत्रण – हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोर अँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments