कारी: (दि१८) प्रतिनिधी
प्रभाकर महादेव गादेकर राहणार कारी यांच्या फिर्यादीनुसार चार लाख 56 हजार तीनशे रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याच्या फिर्यादीवरून पांगरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पांगरी पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर तोरडमल यांच्या मार्गदर्शनाने एका पथकास गोपनीय बातमीदार मार्फत पांढऱ्या रंगाच्या पिकअप मध्ये येडशीकडून ढोकीच्या दिशेने चालला असल्याची माहिती मिळाल्याने ढोकी पोलीस स्टाफचा मदतीने सदरचा पिकप आरोपी नाव (१)नागनाथ अनिल चव्हाण वय 24 राहणार तांबरी तालुका जिल्हा उस्मानाबाद (२) सुरज रामलिंग पवार वय 21 राहणार एकुरका तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद बोलोरो पिकप क्रमांक एम. एच.25 पी. 24 61 मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक तपासाकरिता चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातील पिकप मधून सोयाबीनचे ५९कट्टे जप्त करण्यात आले तपासादरम्यान त्यांनी आणखी एक अशोक लेलँड कंपनीचा पिकआप हा आरोपी नंबर (3 )श्रीकांत विठ्ठल घुगे व 26 राहणार इंदापूर तालुका बार्शी हा विक्रीकरता गेल्याचे सांगितले . त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले असता मा .कोर्टापुढे उभे केले असता कोर्टाने चार दिवसाचे रिमांड दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले , सखोल तपासादरम्यान त्यांनी कारी, वैराग , गौडगाव ,येथील सोयाबीन चोरी, उपळे दुमाला येथील सोयाबीनचे चोरी, वैराग ते सोलापूर रोडवरची सोयाबीनची चोरी यातील आरोपी व इतर साथीदारांसह केल्याचे सांगत असल्याने गुन्ह्यात गेलेल्या सोयाबीन कट्या पैकी 91 कट्टे सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले दोन पिकअप एकूण दहा लाख ५४ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखीन साथीदार व चोरीचे ठिकाणे याचा अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.