झाडबुके महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
कारी (दि१८) प्रतिनिधी
सामान्यतः अल्पसंख्यांक या शब्दाच्या अर्थात बाबत समाजामध्ये अपरिचित पणा जाणवतो अल्पसंख्यांक म्हणजे असा समुदाय की, ज्यांना स्वतंत्र धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभलेले असते. धर्म, अल्पसंख्यांक आणि जनगणना अल्पसंख्यांकांच्या दर्जासाठी महत्त्वपूर्ण बाबी आहेत. अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळणे हा समुदायाच्या विकासाचा जणू राजमार्ग होय. वस्तूत: अल्पसंख्यांक ही एक प्रमुख मध्यमवर्गीय व महत्त्वाची संकल्पना आहे असे मत डॉ सूर्यकांत घुगरे यांनी व्यक्त केले.
ते श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात आयोजित अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बी. आर. काळे होते. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विशाल लिंगायत यांनी करून दिला.
यावेळी प्रा. डॉ. संजय नाईनवाड , डॉ वैभव वाघमारे, प्रा. जे. के. काशीद, ग्रंथपाल अनिल जेवळीकर, प्रा. एस. एस. मुळे, डॉ. कविता गायसमुद्रे आदी उपस्थित होते.