राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० व २६६ निधी मिळावा यासाठी रोहित दादा पाटील यांची मंत्री महोदय यांना साकडे
स्व. आर आर आबा पाटील व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या मैत्रीचा फायदा होण्याची शक्यता मंत्री गडकरी यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले
तासगाव प्रतिनिधी/ राहुल कांबळे
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० व २६६ च्या तासगाव शहराजवळील बाह्यवळण लांबीच्या भूसंपादनासाठी निधी मिळावा यासाठी तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
तासगाव तालुक्यातील अहमदनगर दौंड- फलटण विटा- तासगाव -कुमठे फाटा म्हैसाळ रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० म्हणून घोषित झाला आहे सदर रस्त्याच्या तासगावातील बाह्यवळण मार्गाची एकूण लांबी ०/०० ते २/२०० ( A ) ( भाग-कॉलेज कॉर्नर ते भिलवडी रस्ता) ही लांबी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६६ मध्ये समाविष्ट झालेले आहे त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रुपये ४० कोटी रुपयांची आवश्यकता आहे तसेच सदर रस्त्याची लांबी ( कि.मी.२/२०० ते ७/६५०) ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० मध्ये समाविष्ट झालेले आहे सदर रस्त्याची रस्त्याच्या कि.मी.२/२०० ते ३/६०० ( B) ( भाग भिलवडी रस्ता ते विटा रस्ता) अशी एकूण १.४० कि.मी. लांबीच्या भूसंपादनासाठी अंदाजे रू.३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर उर्वरित कि.मी.३/६०० ते ४/२०० ( C) ( भाग विटा रस्ता ते भिवघाट रस्ता) एकूण ०.६०० कि.मी. लांबीच्या भूसंपादनासाठी अंदाजे १२ कोटी रुपये कि.मी.४/२०० ते ५/१५० एकूण ०.९५ कि.मी.( D)(देवघाट रस्ता ते चिंचणी रस्ता) यांच्या भूमी संपादनासाठी अंदाजे २० कोटी रुपये ची आवश्यकता आहे उर्वरित कि.मी.५/१५० ते ७/६५० ( E,,) ( भाग चिंचणी रस्ता ते मनेराजुरी रस्ता )एकूण २.५० कि.मी. लांबी असून त्याच्या भूसंपादनासाठी रुपये ५० कोटींची आवश्यकता आहे. तासगाव शेरा लगत बाह्यवळण ची भूसंपादनासाठी एकूण रुपये १५२ कोटीची आवश्यकता असून सदर निधी उपलब्ध करून द्यावा व तासगाव शहर बायपास रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे अशी या पत्रात विनंती करण्यात आले आहे. दिल्ली येथे महाराष्ट्रातील प्रशिक्षणासाठी आमदार दाखल झाले आहेत तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी महाराष्ट्रातील दिल्ली येथे एक वजनदार मंत्री असणारे आणि आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामधील जनतेच्या मनामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडे तासगाव शहरालगत असलेल्या बाह्यवळण रस्त्याच्या निधीसाठी पत्र द्वारे मागणी केली सदरचे पत्र तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते रोहित दादा पाटील यांनी समक्ष भेटून मंत्री महोदयांना भेटून त्याचा पाठपुरावा केला त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद देत मंत्रिमहोदयांनी तातडीने निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.सध्या तासगाव शहरा वर प्रचंड वाहतुकीचा ताण आहे. बायपास रस्त्यासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध झाला तर विटा भागातून तसेच आटपाडी कडून येणारे सर्व वाहने बाह्यवळण मार्गे पुढे कराड व सांगली,मिरज कोल्हापूर कर्नाटकाकडे कडे जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त लवकर पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाल्यास तासगावकर नागरिकांच्या मनामध्ये समाधान निर्माण होईल असे म्हटले तर वावगे ठरू नये. तासगाव शहरातील प्रचंड वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.