Home Blog Page 45

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

  • कोल्ड रूमची स्थापना
  • मुबलक औषधी साठा उपलब्ध

धाराशिव दि 31( प्रतिनिधी) जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे.त्यामुळे उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे. जिल्ह्यात वाढते तापमान व पुढील महिन्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची दृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली.यामध्ये उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व आरोग्य संस्थांनी नागरिकांना योग्य उपचार व उष्माघाताबाबत काळजी घेण्याबाबतचे आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यात 5 ग्रामीण रुग्णालये, 6 उपजिल्हा रुग्णालये,44 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 2 शहरी आरोग्य केंद्र येथे कोल्ड रूम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.उष्माघाताच्या उपचारासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. जिल्हयात उष्माघाताबाबत उपाय योजनेसाठी टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्ध साहित्य देखील देण्यात आले आहे.
नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी, रुमाल व छत्रीचा वापर करणे,हलक्या रंगाचे, पातळ सुती कपडे वापरणे,लहान मुले व गरोदर माता वृद्ध यांचे विशेष काळजी घेणे घ्यावी. दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत घराभार जाणे टाळावे.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुल्ला यांनी नागरिकांना केले आहे.

कपड्यांची वाहतूक करणाऱ्या कंटनेरला लागली आग लाखोंचा माल जळून खाक

दहिफळ (योगराज पांचाळ)
कळंब तालुक्यातील दहिफळ- परतापूर रस्त्यावर रात्रीच्या अकराच्या सुमारास रेडीमेड कपड्यांची वाहतुक करणाऱ्या कंटेनरला आग अचानक आग लागली यामध्ये लाखोंचा माल जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, सोलापूरहून अंबाजोगाई कडे जाणारा कंटनेर दहिफळ परतापूर मार्गे कळंब कडे जात होता.बाभळगाव येथे ड्रायव्हरचे नातेवाईक होते जाता जाता भेटावे म्हणून या मार्गे रेडीमेड कपड्यांनी भरलेली गाडी रस्त्याने जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला गेली गाडी वर घेताना टायर गरम होऊन टायरने पेट घेतला.पत्रा गरम झाल्यामुळे आतील कपड्याला आग लागली.काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले गाडी पेटली.रात्रीची वेळ होती.जवळ वस्ती असल्यामुळे काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जवळ शेतात असलेले बोअर चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात आली नाही.
घटनेची माहिती मिळताच
वैभव काळे, तात्या भातलवंडे, मनोज गोरे,वैभव गायकवाड, गोपाळ शिंदे समाधान वाघमारे अतुल वाघमारे यांच्यासह
परतापुर दहिफळ बाभळगांव च्या २५-३० तरुणांनी तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करुन आग विझवण्याचा प्रयत्न केला आग आटोक्यात येण्याजोगी नसल्याचे लक्षात येताच तुषार वाघमारे यांनी फोन करून पोलीस व अग्निशामक दलास पाचारण केले.
कळंब नगरपालीकेचे कर्मचारी महादेव हाजगुडे व गजानन जाधवर यांनी वेळीच धावून येत आग्निशामकच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.परंतू कपड्यांची राख रांगोळी झाली होती.लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.
गाडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे, कडब्याच्या गंजी, सोलारपंप होते अग्नीशामक गाडी वेळीच आल्यामुळे मोठ्याप्रमाणात हानी टळली.

शासन निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन सहायक समाज कल्याण आयुक्त बी.जी. अरवत यांच्यावर गुन्हा दाखल!

धाराशिव – शासन निर्णय तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे सहायक समाज कल्याण आयुक्त बी.जी. अरवत यांना महागात पडले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,
२५ मार्च रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा सत्र न्यायालयात चालणारा व त्यास 07 वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेला गुन्हा घडल्याने व गंभीर गुन्हयात व सत्र न्यायालयात चालणारे गुन्हयात शासकिय पंच घेणे बाबत शासन निर्णय आहे.त्याच शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी दैनंदिन वार ठरवुन देवुन त्या बाबत त्यामध्ये नमुद दैनंदिन ठरवुन दिलेल्या वार प्रमाणे कार्यालय प्रमुखानी त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांना ठरवुन दिलेल्या आठवडयातील नियमानुसार पोलीस ठाण्यास दाखल झालेल्या गंभीर गुन्हयाचे तपासकामी, गुन्हयातील जप्ती पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी मानसिक व शारीरीक दृष्ट्या सक्षम असलेले दोन शासकिय कर्मचारी पंच म्हणुन उपलब्ध करून देण्यात यावे असे परिपत्रक आदेश आसल्याने व आठवडयातील मंगळवार हा दिवस समाज कल्याण अधिकारी, कार्यालय धाराशिव यांचा दिवस/वार होता.
बीट अंमलदार पोहेकाँ/379 गलांडे, 872 पाटील दोघे ने.पो.स्टे. धाराशिव शहर याना समाज कल्याण अधिकारी, कार्यालय धाराशिव येथे ठरवुन दिलेला मंगळवार हा वार असल्याने पाठविण्यात आले होते. सहा. आयुक्त बी.जी. अरवत यांनी गंभीर गुन्हयाचे तपासकामी दोन शासकिय पंच उपलब्ध करून देणे बाबत मुलःत असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे उलट टपाली लेखी पत्र देवुन शासकिय पंच पुरविले नाही त्या मुळे आम्ही या गंभीर गुन्हयाचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करणे कामी ऐनवेळेस खाजगी पंच उपलब्ध करून त्यांचे समक्ष पंचनामा केला. सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने व शासनाचे आदेश असताना सुध्दा समाज कल्याण सहा. आयुक्त बी.जी. अरवत समाज कल्याण धाराशिव यांनी शासकिय पंच पुरविले नाही. त्यानी शासनाचे आदेशाचे व जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे आदेशाचे अवमान करून आदेशाचे उल्लंघन केले त्यामुळे फिर्यादी नामे दिनेश उत्तमराव जाधव सपोनि पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि २८ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 188, 187 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

गृह विभागाचा शासन निर्णय काय सांगतो
एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्याच्यावेळी उपस्थित असलेल्या पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्वपुर्ण ठरत असतात. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीस येण्याकरिता काही प्रकरणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो. तपासी अधिका-याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थितीत केलेले पंच सुनावणी दरम्यान प्रामाणिक राहतील याची खात्री नसते. पंच फितूर झाल्यामुळे ब-याचश्या गंभीर गुन्हयांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे दोषारोपसिध्दीचे प्रमाणे घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. गुन्हयाच्या तपासादरम्यान पंच म्हणुन सरकारी कर्मचा-यांची सेवा घेतल्यास सुनावणी दरम्यान पंच फितुर होण्याची शक्यता फार कमी राहिल यासाठी गृह विभागाने शासन निर्णय काढला आहे.
पंच फितुर होऊन दोषारोपसिध्दीचे प्रमाण कमी होणा-या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्हयांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

२. ज्या गुन्हयामध्ये सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा नमूद केली असेल अशा प्रकरणांमध्ये तपासी अधिकारी यांनी शक्यतोवर सरकारी कर्मचा-याची पंच म्हणून सेवा घ्यावी.

३. सदरची सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे त्या परिसरात वास्तव्य असणा-या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घ्यावे जेणेकरुन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सदर पंचास उपस्थित राहणे सुलभ होईल.

४. पंच म्हणून घेत असलेल्या सरकारी कर्मचा-याचे चारित्र्याबाबत प्रथम मौखिक स्वरुपात तपास अधिका-याने खातरजमा करुन घ्यावी.

५.एकाच सरकारी कर्मचा-यास अनेक गुन्हयांत वारंवार पंच म्हणून घेण्यात येवू नये.

६. गुन्हयातील फिर्यादी व आरोपी यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचा-यास पंच म्हणून घेण्यात येवू नये.

४ हजाराची लाच स्वीकारली, मंडळ अधिकारी लाचलुचपत च्या ताब्यात


धाराशिव –
मुरुमाची रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी,तलाठी यांना कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ देवानंद मरगु कांबळे  वय 51 वर्षे , मंडळ अधिकारी (वर्ग-३), येरमाळा सर्कल, ता.कळंब, जि.धाराशीव. यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मौजे चोराखळी येथील देवस्थान जमिन गट क्रमांक 639/1 मधील 50 ब्रास मुरूम रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणे बाबत सांगणे करिता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 4000/-रुपये लाचेची मागणी करून 4000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस निरीक्षक यांनी काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके यांचा समावेश आहे.

दगडफेकीत २३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल

धाराशिव – २५ मार्च रोजी धाराशिव शहरात झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी संशियातंची धरपकड सुरू केली असून सीसीटिव्ही आणि इतर फुटेज पाहून २३ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.आरोपी नामे-1)वसीम दस्तगीर शेख, 2) हज्जु शेख, रा. तालीम गल्ली, 3) अमीर उर्फ हमदू शेख, 4) मोहसीन शेख, 5) फैय्याल ईस्माईल काझी, 6) जमीर सिटी फर्निचरवाला, 7)हाजी मलंग सत्तार सय्यद उर्फ निहाल, 8) नवीद शेख रा. खाजानगर गल्ली नं 19 धाराशिव, 9) अरबाज पठाण रा. एकमिनार मस्जीदजवळ, 10) आलीम कुरेशी, 11) अरबाज शेख, 12) सलीम शेख लिमरा हॉटेलवाला, 13) गौस शेख यांचे सह 100 ते 125 इसम सर्व रा. खाजा नगर धाराशिव, 14) सागर भांडवले, 15) सौरभ काकडे, 16) निलेश साळुंके, 17) हनुमंत यादव, 18)ओमकार शामराव कोरे, 19)विनय, 20) बापू देशमुख, 21) राहुल बबन भांडवले, 22) राज निकम, 23) मनोज जाधव व यांचे सह 70 ते 80 इसम सर्व रा. गणेश नगर धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 20.45 वा. सु. गणेश नगर धाराशिव येथे बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना त्यांचा जमाव हा बेकायदेशीर असुन तेथुन शांततेत निघून जाण्याबाबत समजावून सांगूनही तेथुन निघून न जाता दगड, विटा, फरशीच्या तुकडे व काचेच्या बाटल्या एकमेकांवर पोलीस पथकावर व खाजानगर आणि गणेशनगर परिसरातील राहणारे नागरिकांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शासकीय वाहन व जनतेच्या वाहनांचे नुकसान केले व आरडा ओरडा व शिवीगाळ केल्याने जनतेत दहशत निर्माण झाली. तसेच कर्तव्यावरील पोलीस अंमलदार यांना जखमी करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदिप ओहोळ पोलीस उप निरीक्षक नेमणुक धाराशिव शहर पोलीस ठाणे यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 336, 109, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वारदवाडी-परंडा राज्यमार्गाच्या कामाकडे सार्वजनीक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष


साईड पट्टयाचे खोदकाम अंदाजपत्रका प्रमाणे न करता साईडपट्टयात माती मिश्रीत मुरूम टाकून साईड पट्टयाची दबाई!


सोनगीरीच्या पुलाजवळ रस्ता रुंदीकरणासाठी मातीचा वापर!


परंडा( भजनदास गुडे )गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या वारदवाडी ते परंडा काशीमबाग पर्यंतच्या रस्त्याचा ठेका धुळे येथिल देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला असुन सदर रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
       ठेकेदार यांच्या कडून अंदाज पत्रकाप्रमाणे रस्त्याचे कम करण्यात येत नसुन थातूर मातूर काम करण्यात येत आहे.सोनगीरी नदी पुलाल गदच्या वळणावर रस्त्याचे रुंदीकर करण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे.या गंभीर बाबीकडे परंडा सार्वजनीक बांधकाम विभागा कडून दूर्लक्ष केले जात आसल्या मुळे प्रवाशातून आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
            सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाकडे जानीव पूर्वक दुर्लक्ष का?करीत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक व प्रवाशी नागरिकांतून  होत आहे.
         तसेच अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याची साईड पट्टयाची खोली ४९ सेंटीमीटर खोदकाम करून  हार्ड मुरूम भरणे गरजेचे असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्टीचे खोदकाम अंदाज पत्रकाप्रमाने न करता अपूर्ण खोदकाम करून माती मिश्रीत मुरूम टाकुन दबाई करण्यात येत आहे.
         अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याचे काम करून घेण्याची जबाबदारी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असताना त्यांच्या कडून दर्जाहीन होत असलेल्या रस्त्याच्या कामाकडे जानीव पुर्वक दुर्लक्ष होत आसल्याचे दिसत आहे.
            रस्त्याचे काम अंदाज प्रत्रकानुसार न झाल्यास शासनाचे कोट्यावधी रुपये वाचा जाऊन काही वर्षात रस्ता पुन्हा खराब होऊन त्याचा वाहनधारक व प्रवाशाना त्रास सहन करावा लागनार आहे.
           या रस्ता कामाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करून अंदाजपत्रका प्रमाने काम करून घ्यावे अशी मागणी वाहाणधारक व प्रवाशी नागरीकातुन होत आहे.

तूळजापूर येथे ड्रायव्हरनेच मारला ८५ लाखावर डल्ला,आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथक रवाना 



तुळजापूर – (ज्ञानेश्वर गवळी)
तुळजापूर शहरातील एचडीएफसी बँक येथील एटीएम मध्ये  कॅश भरण्यासाठी आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरने महिंद्रा बोलेरो चार चाकी वाहनांमध्ये हवा भरतो म्हणून गाडी घेऊन जाऊन गाडीसह तब्बल ८५ लाख रुपये घेवून पसार झाल्याची  घटना शहर दि.२२ मार्च रोजी घडली आहे. या बाबत तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे . पोलिसांनी विविध ठिकाणी तीन पोलीस पथक रवाना केली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून मिळत आहे .

या बाबत पोलिस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील एच डी एफ सी बँक येथे हिताची या कंपनीची बोलेरो गाडी क्रमांक MH -04 -JK – 4407 हे वाहन दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅश भरण्यासाठी आली होती .सदर गाडीमध्ये ड्रायव्हर सह,अन्य तीन जण होते. तीन  कर्मचारी कॅश भरण्यासाठी एच डी एफ सी बँक येथील ए टी एम मध्ये गेले असता ड्रायव्हर यांनी महिंद्रा बोलेरो या गाडीत हवा भरून येतो म्हणून संधीचा फायदा घेत गाडी व रोख रक्कम अंदाजे ८५ लाख रुपये घेऊन फरार झाला .सदर प्रकार तिन्ही कर्मचारी यांच्या लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरला शोधाशोध केल्यानंतर ड्रायव्हर सापडत नसल्याने  अखेर त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली सदर घटनेची माहिती दिली.

तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली व सदर गाडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर गाडी तुळजापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर पांडुरंग नगर येथे सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळून आली .सदर गाडीजवळ कोणीही नसल्याचे दिसून आले गाडीची झाडाझडती घेतली असता  ड्रायव्हर  फरार असल्याचे दिसून आले तर गाडी मधील वेगवेगळ्या एटीएमला पैसे भरण्यासाठी आणलेली कॅश तब्बल अंदाजे ८५ लाख रुपये गाडी चालक  घेऊन फरार झाल्याचे  निदर्शनास आले .

वैभव शंकर वय २५ वर्ष कॅश मॅनेजमेंट अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे ड्रायव्हर सचिन विलास पारसे व अन्य एक तरुण राहणार दत्तनगर तेरणा कॉलेज जवळ धाराशिव असे दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर 132/2024 भादवि कलम 406,408,420,381,120,(4)34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत . दरम्यान तीन पोलीस पथक आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले असून सदर आरोपीचा शोध चालू आहे .

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख,पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडेकर,पोलीस हवलदार रवी भागवत,पोलीस कॉन्स्टेबल अजित सोनवणे,पोलीस कॉन्स्टेबल वानखेडे,पोलीस हवालदार गणेश माळी,पोलीस हवालदार पोपट क्षीरसागर,पोलीस हवालदार संतोष करवार इत्यादी तत्काळीत घटनास्थळी दाखल झाले.
दिवसा ढवळ्या ड्रायव्हरने संधीचा फायदा साधत ८५ लाख रुपये घेऊन गेल्यामुळे पोलीस खात्यासमोर आरोपीच्या शोधासाठी मोठे आव्हान असणार आहे .

आरोपींनी एक खाजगी वाहना मधून सदर कॅश तुळजापूर वरून सोलापूर दिशेने घेऊन जाऊन वाटेमध्ये तामलवाडी परिसरामध्ये लॉकर चे कुलूप तोडून लॉकर मधील रोख रक्कम ८५ लाख रुपये घेऊन जाऊन रिकामी लॉकर पेटी त्या ठिकाणी सोडून सोलापूर दिशेनी चार चाकी गाडीमध्ये फरार झाला .अशी माहिती मिळत आहे.
 एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन खाजगी गाडी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .तर गुन्ह्यामध्ये अन्य काही आरोपी फरार आहेत त्यासाठी वेगवेगळे पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहेत

31 मार्चला बॅंका रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याचेजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धाराशिव दि.20(प्रतिनिधी):-वित्तीय वर्ष सन 2023-2024 या वर्षाच्या रक्कमांचे सर्व व्यवहार 31 मार्च 2024 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये आणि नागरीकांना शासकीय रक्कमांचा बँकेत भरणा करण्यासाठी तसेच बँकेतून रक्कमा काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील शासकीय रक्कमेचा देवाण-घेवाणीचा व्यवहार करणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँका रविवार 31 मार्च - 2024 रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.

दिल्लीवारी झाली तरी महायुतीचा पैलवान ठरेना, खा. राजेनिंबाळकरांचा गावभेटीवर भर

धाराशिव – ७ मे रोजी उस्मानाबाद लोकसभेसाठी मतदान होणार आहे मात्र अद्यापही महायुती आणि इतर पक्षातील उमेदवार जाहीर होत नसल्याने लोकसभेच्या आखाड्यात कोणते पैलवान उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर गावभेट दौरा करत आहेत.
महायुतीतील विशेषतः शिवसेनेतील काही नेते दिल्ली येथे तळ ठोकून होते तिथे काही नेत्यांशी गाठीभेटी त्यांनी घेतल्या आज ते मुंबईत आहेत मात्र त्यांना तिकीट न देण्यावर भाजप ठाम आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यातील नेमका तपशील समोर आला नसला तरी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी तिकीट आजच फायनल होईल असे विश्वासाने सांगत होते. तर भाजपचे काही पदाधिकारी दिल्लीत असल्याची चर्चा होती मात्र एका महत्वाच्या नेत्याने त्याला दुजोरा दिला नाही. राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार यांना देखील महायुती कडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे ते देखील मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
तर बसपा सह इतर पक्षांनी देखील आपली आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे मात्र त्यांचे देखील उमेदवार न ठरल्याने लढत कशी होणार हे अस्पष्टच आहे.

असा मध्यमार्ग निघण्याची शक्यता

भाजप उस्मानाबाद लोकसभेचा दावा सोडण्यास तयार नाही त्यात ही जागा आमची आहे उमेदवार आमचाच असेल असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे मात्र शिवसेना देईल तोच उमेदवार मात्र भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा मध्यममार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तग धरण्यासाठी मुंबईच
खासदार झाल्यास दिल्लीतील राजकारणात जावे लागते परिणामी भविष्यातील मंत्रिपद, पालकमंत्रिपद जाते. त्यामुळेच पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील हे स्वतः निवडणूक लढवण्यास तयार नाहीत मात्र महायुतीच्या नेत्यांकडून दोघांपैकी एक उमेदवार प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकतो असा विश्वास असल्याने त्यांनाच ही निवडणूक लढविण्याची गळ घातली गेली होती.

राजकीय पक्षांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण,निवडणूक काळात विविध परवानग्या देतांनाराजकीय पक्षांना सहकार्य करण्यात येईल-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

धाराशिव,दि.19(प्रतिनिधी): येत्या 7 मे रोजी होणाऱ्या 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्षांचे तसेच अन्य उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्या देतांना सहकार्य करण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विविध परवानग्या मिळण्यासाठी सुविधा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सुविधा पोर्टलची माहिती, नामांकन अर्ज सादर करणे, प्रतिज्ञापत्र भरणे आणि विविध परवानग्या मिळणे तसेच माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची कामे याची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.ओम्बासे बोलत होते.
यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी तथा संगणक सुरक्षा, आयटी ॲप्लीकेशन कक्षाचे नोडल अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, महसूल तहसिलदार तथा सी-व्हिजील व विविध परवाने कक्षाचे नोडल अधिकारी प्रवीण पांडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.ओम्बासे म्हणाले, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे आणि विविध निवडणूकविषयक परवानग्या काढणे याबाबीस हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांना निवडणूकविषयक कामे करणे सोपे जाणार आहे. जे राजकीय पक्ष सुविधा पोर्टलवर विविध परवानग्या मिळण्यासाठी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम परवानग्या दिल्या जातील. अशाप्रकारे कामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
श्री.पांडे यांनी एक खिडकी कक्षातून तात्पुरते पक्ष कार्यालयासाठी अर्ज करणे, ना हरकत प्रमाणपत्र व परवानगी पत्राचे नमुने तसेच सुविधा पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करुन परवानग्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
उमेदवार व त्यांना प्रतिनिधींनी ऑनलाईन परवानग्या मिळण्यासाठी अर्ज करावे असे सांगून श्री.पांडे म्हणाले, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना काही परवानग्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राकरीता पाहिजे असल्यास त्यांनी संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन त्या परवानग्या घ्याव्यात. संपूर्ण लोकसभा क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून घ्याव्यात. जे वाहन निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार आहे, त्या वाहनाचे चारही बाजूंचे फोटो उपलब्ध करुन द्यावे. ज्या ठिकाणी कॉर्नर सभा व रॅली काढण्यात येणार आहे, त्या ठिकाणची व त्या मार्गाचे संबंधितांचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलीकॉप्टरने येणाऱ्या राजकीय नेत्यांचे हेलीकॉप्टर उतर‍विण्याच्या ठिकाणची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून देण्यात येणार असल्याचे श्री.पांडे यांनी सांगितले.
श्री.रुकमे यांनी सुविधा पोर्टलची माहिती दिली. उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूकविषयक विविध परवानग्या या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन मिळविता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष परवानग्या मिळविण्याचा त्रास वाचण्यास मदत होणार आहे.
उमेदवार किंवा प्रतिनिधींना सुविधा पोर्टलवरुन विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी संबंधिताचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, उमेदवाराचे संपूर्ण नांव व जन्मतारीख पोर्टलवर नमुद करणे आवश्यक आहे. असे सांगून श्री रुकमे म्हणाले, सुविधा पोर्टलवर उमेदवार व राजकीय पक्षांना अर्ज करता येतील. उमेदवारांचे नामांकन ऑनलाईन भरण्याची सुविधा या सुविधा पोर्टलवर आहे. प्रतिज्ञापत्र देणे व विविध परवानग्या काढण्याची सुविधा या पोर्टलवर आहे. उमेदवाराने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे व परवानग्या काढणे ह्या बाबी सोप्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे यांनी माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली. ही समिती राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण, पेडन्युज संबंधित कामकाज, निवडणूक खर्चाच्या दृष्टिकोणातून जाहिरातीवर लक्ष ठेवण्यासोबतच निवडणूकविषयक पॉम्पलेटस, पोस्टर हॅन्डबील यावरही समितीचे संनियंत्रण राहणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी 3 दिवस अगोदर अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हस्तपत्र, घडीपत्रिका किंवा भित्तीपत्रके मुद्रक आणि प्रकाशकाच्या उल्लेखाशिवाय प्रकाशित करु नये. असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांसाठी आयोजित या प्रशिक्षणाला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, शिवसेना (ठाकरे गट) संदिप खोचरे, वंचित बहुजन आघाडीचे शितल चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव प्रविण जगताप, जिल्हा सचिव सादीकखॉ पठाण यांची उपस्थिती होती.