Home Blog Page 44

भूम च्या शिंदेंनी घेतला पहिला अर्ज लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात

धाराशिव – लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पहिला अर्ज भूम च्या आर्यनराजे शिंदे यांनी घेतला आहे.
राष्ट्रीय समाज दल (आर) या पक्षाच्या वतीने त्यांनी हा अर्ज घेतला असून ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या तासात सहा अर्जांची विक्री झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी संख्या वाढू शकते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त असून गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीसोबत मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.

अर्चना पाटील यांच्या कळंब, औसा  भागातील दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव  : राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदार संघातील उमेदवार अर्चना पाटील यांनी नुकताच कळंब आणि औसा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला यावेळी भाजप आमदार अभिमन्यु पवार यांच्यासह महायुती च्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. अर्चना पाटील यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

औसा  विधानसभा मतदार संघातील हासुरी, हरी जवळगा, मदनसुरी, भूतमुगळी, सरवडी, एकोजी मुदगड या गावांना भेटी देऊन प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.. येत्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटन दाबून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करावे, असे आवाहन यानिमित्ताने केले.. यावेळी आमदार अभिमन्यू पवार,  शोभाताई पवार, महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सत्कार केला व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

कळंब तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी लकडे, राष्ट्रवादी वक्ता प्रवक्ता विभागाचे प्रदेशाध्यक्ष  सुशील शेळके, किसान सेल जिल्हाध्यक्ष  प्रकाश बावणे, तालुका उपाध्यक्ष  आगतराव कापसे, कार्याध्यक्ष  गणेश भोसले, तालुका सचिव  आबासाहेब अडसूळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मी शिफारस केलेला उमेदवार महायुतीने दिल्याचा आनंद असल्याचे सांगत अर्चना पाटील यांचा विजय होईल असा विश्वास आमदार अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केला.

“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

धाराशिव :  आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आलीय. यातच आता दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर टिका केली. त्यावर आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

धाराशिव लोकसभा मतदारसंघात जवळपास २२ ते २५ उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातील सगळेच लोकप्रतिनिधींनी अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. राजकारणात ज्यावेळी शरद पवारांनी मोठी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी त्यांची पाठराखण करण्याचं काम पद्मसिंह पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख भूमिका घेण्याचंही काम पाटील यांनी केलं आहे. 

त्यामुळे ज्यांच्याकडून काम होतंय, त्यांच्या नावाची शिफारस पुढे आली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखाली आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीने आमच्या मतदारसंघात खुप निधी आला. तो आम्ही आतापर्यंत स्वप्ननातही पाहिला नाही. यातच आता समोरून जे काही बोलबच्चून सुरू आहे. त्यांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही आतापर्यंत मतदारसंघात किती निधी आणला ? ते जाहीर करा. असेही आवाहन त्यांनी केलंय.

आपल्या मतदारसंघात नवीन रोजगार निर्माण करणं, रोजगार आणणं, योजना आणणं हे काम खासदाराचं आहे. एसटीत जागा देणं हे त्यांचं काम आहे का ? असा सवालही राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांना विचारलं. बार्शी तालुक्यात आतापर्यंत २ कोटीपेक्षा निधी आणला असल्याचाही त्यांनी दावा केला. मोदींच्या नावावर मत मागितली. मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच माझ्याविरोधात उभं राहा म्हणायचं. ही कृतघ्न झाली. अर्चनापाटील यांनी असा टोलाही त्यांनी लगावला.

अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेल व लॉजवर छापा लॉज मालकावर गुन्हा नोंद

 

धाराशिव -आरोपी नामे- किरण महादेव गुरव, वय 33 वर्षे, व्यवसाय (हॉटेल/लॉज मालक)  रा. तांबरी विभाग गणपती मंदीर जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.08.04.2024 रोजी 15.00 वा सु जुनोणी रोड अंबेहोळ रोडच्या लगत हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअरबार रेस्टॉरंट ॲड लॉज धाराशिव येथे दोन महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पंचा समक्ष मिळून आला. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत दोन महिलेंची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 370, सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम  4, 5, 6, 7 अन्वये धाराशिव शहर पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

परंड्याचे सुपुत्र प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना मलेशिया विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर

परंडा,(प्रतिनिधी) परंडा शहरातील प्रा.डॉ.सत्यजित पानगांवकर यांना नुकतीच मलेशिया येथील इनटी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे रिसर्च फेलोशिप जाहीर झाली.ही फेलोशिप त्यांना दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.
पुणे येथील एम.आय.टी. विद्यापीठकडून मागील वर्षी पानगावकर यांना पी.एच.डी. प्रदान करण्यात आली होती. त्यांच्या संशोधनातील उत्कृष्ट कामाच्या आधारे व अध्यापनाच्या अनुभवाच्या अनुषंगाने त्यांना पुढील संशोधनासाठी ही फेलोशिप फायदेशीर ठरणार आहे.आर्टिफिशीअल इंटेलेजन्स आणि मशीन लर्निंग या विषयाशी निगडित त्यांचे संशोधन आहे. तसेच ते सध्या उज्जैन,मध्यप्रदेश येथिल अवंतिका विश्वविद्यालय येथे अभियांत्रीकीच्या संगणक विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत व विविध संशोधनपर प्रोजेक्ट वर काम करत आहेत.
प्रा.डॉ.सत्यजित पानगावकर या फेलोशिप च्या माध्यमातून मलेशियात रिसर्च प्रोजेक्ट,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिसर्च पब्लिकेशन्स आणि विविध ग्रँट्स साठी काम करतील. त्यांनी आता पर्यंत ०१ पेटंट,८ कॉपीराईट,०१ रिसर्च ट्रेडमार्क तसेच ३५ संशोधनपर पेपर्स लिहिलेले आहेत.आपल्या संशोधनाचा उपयोग जगातील सर्व सामान्यच्यासाठी व्हावा अशी त्यांची तळमळ आहे.
प्रा. डॉ.सत्यजित पानगांवकर हे मूळचे परंडा शहरातील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी विविध क्षेञातील मान्यवरांनी, मिञपरिवारांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

बुजवडे येथे मद्य वाहनासह १० लाखाचा मद्देमाल जप्त

कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क
कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील बुजवडे येथील गोवा बनावटीच्या मद्य साठ्यावर कारवाई केली असून, यावेळी ३ लाख ६० हजार ४८० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ असा अंदाजे १० लाख १० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
काळया रंगाच्या स्कॉपिओ नं. GA-01-R-9022 या वाहनाची तपासणी केली असता, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याने भरलेले विविध बँडचे ७५० मिली व १८० मिलीचे ५९ बॉक्स मिळून आले. वाहन व मुद्देमाल संशयित शिवाजी गावडे व दशरथ सावंत यांचा असल्याचे समजते. त्यांना फरार घोषीत करुन या गुन्हयामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास चालू आहे. विदेशी मद्य मॅकडॉल नं.१ व्हिस्कीचे ७५० मिलीचे १२ बॉक्स, डीएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ७५० मिलीचे ३ बॉक्स, गोल्डन एस ब्ल्यू व्हिस्कीचे ७५० मि.ली.चे २५ बॉक्स, गोल्डन एस
ब्ल्यु व्हिस्कीचे १८० मिलीचे २५ बॉक्स, किंगफिंशर स्ट्रांग बिअर चे ५०० मि.ली. ४ बॉक्स असे एकूण ५३४ ब.लि. वाहनासह जप्त करण्यात आले. मुद्देमाल १०,१०, ४८० चा असून मद्याची किंमत ३,६०,४८० आहे. आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे करत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीश कर्चे, दु. निरीक्षक अभयकुमार साबळे, जवान राजेंद्र कोळी, विशाल भोई, सचिन लोंढे, मारुती पोवार, साजिद मुल्ला यांनी केली.

आरोग्य मित्र डॉ.राहूल घुले यांच्या वतीने बंगाळवाडी येथील २०० रुग्णांची मोफत तपासणी

परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील बंगाळवाडी येथे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता सप्ताच्या शेवटच्या दिवशी दि६ एप्रिल रोजी आरोग्य मित्र डाॅ.राहुल घुले मित्र परिवार परंडा यांच्या वतीने सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आरोग्य तपसणी नंतर रुग्णांनानवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
तपासनी दरम्यान ज्या रूग्णाचे ऑपरेशन करणे अवश्यक आहे अश्या रुग्णाचे ऑपरेशन डाॅ.राहुल घुले यांच्या मार्फत मोफत करण्यात येणार आहेत.या शिबीरामध्ये एकुन २०० रुग्णांची तपसणी करुन मोफत औषध उपचार करण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी डाॅ.राहुल घुले मित्र परिवाराचे कार्यकर्ते मैनुद्दीन शेख,मिनाक्षी काळे मॅडम,गायत्री चोबे,तसेच डोंजा सर्कल प्रमुख सुहास पाटील, डाॅ मुंडे सर,फारमासीस्ट सुरज बांगर,भुम परंडा वाशी तालुका संघटक दादा मुंडे,सुयाज शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.
बंगाळवाडीचे दादा गोडसे, कानीफनाथ सुर्यवंशी,पांडुरंग सुर्यवंशी,सतीश सुर्यवंशी,प्रतिक्षा सुर्यवंशी,रोहीणी सुर्यवंशी, आदीनी शिबीर यशस्वीतेसाठी डॉ राहुल घुले यांच्या आरोग्य टिमला सहकार्य केले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची परंडा येथे आढावा बैठक संपन्न;परंडा तालुक्यातुन ओमप्रकाश राजेनिबांळकर यांना जास्तीची लीड देऊन पुन्हा लोकसभेत पाठवा-सुनिल काटमोरे

परंडा (प्रतिनिधी) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे दि८एप्रिल रोजी परंडा तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख,वार्ड प्रमुख,बुथ प्रमुख,शिवसैनीक यांची आढावा बैठक पार पडली.
या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिलजी काटमोरे,जिल्हा प्रमुख रणजीत पाटील,तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी उपस्थित शिवसैनिकाना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उस्मानाबाद लोकसभेचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश
राजेनिबांळकर यांना परंडा तालुक्यातुन जास्ती जास्त मताची लीड देऊन पुन्हा लोक सभेत पाठवा असे अवाहाण केले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,शिवसेना समन्वयक जनार्धन मेहेर,माजी नगराध्यक्ष सुभाष शिंदे,शिवसेना शहरप्रमुख रईस मुजावर,माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी,शिवसेना महीला आघाडी तालुका संघटक छायाताई जोगदंड,शिवसेना उप तालुका प्रमुख दिलाप रणभोर, उप तालुका प्रमुख रमेश गरड, उप तालुका प्रमुख शिवाजी कासारे,उप तालुका प्रमुख बुध्दीवान गोडगे,उप शहर प्रमुख उमेश परदेशी,विजय खरसडे, सुदाम देशमुख,हरि नलवडे, किरण शिंदे,अनिकेत काशिद, जावेद बागवान,दिपक गायकवाड,शाहु खैरे,अशोक गवारे,शिवाजी देवकर,सागर ठवरे,बिभिषण घोगरे,प्रदिप नेटके,भगवंत लांडगे,आब्बास मुजावर,बाबुराव गायकवाड, संजय कदम,तुषार पाटील, भास्कर शिंदे,दादा होरे,मकरंद जोशी,संतोष गायकवाड,प्रशांत गायकवाड,संजय वाघ,सुहास कदम,रावसाहेब काळे,संतोष करळे,महेश करळे,सत्तार पठान यांच्यासह परंडा तालुका व परंडा शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख/वार्डप्रमुख /बुथप्रमुख व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा अन् औषधे घेण्यासाठी बाहेर पळा!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधांचा तुटवडा!!

धाराशिव – वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यातील अडचणी दूर होताना दिसत नाहीत. भौतिक सुविधांचा अभाव तर आहेच मात्र सध्या उन्हाळा सुरू आहे त्यासाठी आवश्यक असणारे जंतनाशक गोळी व ओ.आर.एस. पावडर सारखे औषध उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
६ वर्षाच्या चिमुरडीला तिचे वडील आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोट दुखू लागल्यामुळे घेऊन गेले होते. मुलीस डॉक्टरांनी दिलेल्या औषधापैकी फक्त एकच गोळी मिळाली. मात्र जंताची गोळी आणि ओ आर एस पावडर मात्र बाहेरून घेण्यास सांगितले.

उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर महाविद्यालयाची पूर्वतयारी नसेल तर रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औषधाच्या अनुपलब्धतेबाबत अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी औषध उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. मात्र औषधासाठा पुरेसा रहावा यासाठी शासनाने निधी देऊनही तुटवडा का होतो? रुग्णांना बाहेरून औषधे का खरेदी करावी लागतात हा संशोधनाचा विषय आहे.

1170 शेतक-यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करून 2994.54 हेक्टर जमीनीवर उतरवला विमा 15 कोटी,68 लाख 15,156 निधीचा अपहार २४ जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये बीड जिल्हयातील १६ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, छत्रपती संभाजीनगर, जिल्हयातील दोन ऑनलाईन चालकाने, परभणी जिल्हयातील दोन ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, नांदेड जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, सोलापुर जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी, धाराशिव जिल्हयातील एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी व अज्ञात एक ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी अशा एकुण २४ ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र नसताना धाराशिव जिल्हयातील एकुण २९९४.५४ हेक्टर शासनाच्या मालकिच्या जमीनीवर ११७० शेतकऱ्यांच्या नावावर शासनाची व विमा कंपनीची फसवणुक करून शासकिय निधी हडप करण्याचे उद्देशाने शासकिय जमिनीचा वापर करून पिक विमा हप्ता भरलेला आहे.
बीड जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 1) संग्राम प्रभु मुरकुटे रा. मुरकुटवाडी ता. जि. बीड 2) चाटे राहूल शिवाजी खापरटोने ता. आंबेजोगाई जि. बीड3) रवि नारायण पुरी घाटनांदूर ता. आंबेजोगाई जि. बीड4) लक्ष्मण विनायक आघाव रा. अबेगाव ता. माजलगांव जि. बीड 5) महादेव गणपती वरकले रा. पहाडी पारगाव ता.धारुर. जि. बीड 6) कृष्णा बालाजी आंधळेरा, हेळंब ता. परळी जिल्हा बीड 7) महेश सोमनाथ बुरांडे धर्मापुरी ता. परळी जि. बीड8) गजानन व्यंकट होळंबे रा. हेळंब ता. परळी जिल्हा बीड 9) अजय दत्तात्रय गुट्टे, हेळंब ता. परळी जिल्हा बीड 10) विश्वनाथ व्यंकट आघाव हेळंब ता. परळी जिल्हा बीड 11) अमर सुभाषराव देशमुखे ता. परळी जि. बीड 12) धनराज महादेव होळंबे रा. हेळंब ता. परळी जिल्हा बीड 13) रविंद्र दामोदर मुंढेरा. लिंबुटा ता. परळी जिल्हा बीड14) नंदनी रावसाहेब होळंबे रा. परळी ता. परळी जि. बीड 15) विष्णु महादेव नागरगोजेरा. नागदरा ता. जि. बीड 16) विजय गिरधारी फड रा. धर्मापुरी ता. परळी जि. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 17) कृष्णा राम आंधळे रा. धनवत ता. सोयगाव जि. औरंगाबाद 18) कुणाल जयदेव मुळे रा. वडगांव कोल्हाटी ता. सोयबांव दि. औरंगाबाद व परभणी जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 19) संदेश वैजीनाथ मुंढे रा. आंतरवेली ता. गंगाखेड जि. परभणी 20) धनराज उत्तम चैधर रा. पराढ्वाडी ता. परभणी ता. जि. परभणी व नांदेड जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 21) रघुनाथ प्रभु घोडके रा. धनोरा (मुक्ता) ता. लोहा जि. नांदेड व सोलापुर जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 22) नावजी सौदागर अनभुले रा. उपळाई खु ता. माढा जि. सोलापुर धाराशिव जिल्हयातील ऑनलाईन सेवा केंद्र चालक 23) भोगील पांडूरंग जयराम रा. दांडेगाव ता. भुम 24) अज्ञात ऑनलाईन सेवा केंद्र व ऑनलाईन सेवाकेंद्राचे चालक यांनी धाराशिव जिल्हयातील 2994.54 हेक्टर जमीन ही शसनाच्या मालकीची आहे. ती शेतक-यांच्या मालकीची नाही अथवा शासकिय जमीनीवर भाडेकरार/संमंतीपत्र केलेले नाही, हे माहित असताना सुध्दा, ती 1170 शेतक-यांच्या नावे बनावट सातबारे व 8 अ उतारे तयार करून, ते खरे आहे असे दाखवून, शासनाची फसवणूक करून प्रत्येकी पिक विमा हप्ता (प्रिमियम) रु. 1/- असे 1170 शेत-यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामुळे शासनाने रू. 3,13,71,635.50/- एवढी रक्कम विमा कंपनीला विमा हप्ता (प्रिमीयम) स्वरूपात अदा केल्यामुळे शासनाची
गैरहानी झालेली आहे. तसेच त्यावर पिक संरक्षित होणारी एकुण रक्कम रू. 15,68,15,156/- एवढा शासकीय निधीचा अपहार करण्याचे उद्देशाने बनावट दस्तऐवज बनवून, बनावट नोंदी घेऊन सदरची रक्कम अपहार करण्याचा प्रयत्न केला आहे. वैगेरे फिर्याद जबाबवरुन वरीष्ठआंच्या आदेशाने गुन्हा दाखल करुन एस. डीपीओ सो यांच्या आदेशाने पुढील तपास पोनि आर्थीक गुन्हे शाखा श्रीगणेश एस. कानगुडे यांच्याकडे देण्यात आला.