Home Blog Page 42

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अटी बदलल्या, ५ एकर शेतीची अट वगळली

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती मात्र योजनेतील अटी शर्तीमुळे या योजनेचा लाभ अनेकांना होणार नसल्याचे विरोधीपक्षनेत्यांनी बोलून दाखवले होते मात्र आता बदल करण्यात आला असून

या योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
तसेच योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

यासोबत महत्वाची बाभांजे योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
याबरोबरच योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

भर दिवसा गोळीबार, परंडा तालूक्यातील भोत्रा शिवारातील घटना

गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल

परंडा(प्रतिनिधी) – वाळू च्या कारणा वरून दोन गटात वाद झाल्याने गोळी मारून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकास गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला असुन यामुळे तालूक्यात एकच खळबळ उडाली असुन
हि घटना परंडा तालूक्यातील भोत्रा येथील सिना नदी पात्रात दि २२ जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.
या भांडणात परंडा येथिल योगेश हनुमंत बुरंगे यांच्या कमरेला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. तर कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या दोक्यात दगड लागल्याने तो जखमी झाला आहे.
जखमींना तातडीने परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन गोळी लागलेल्या योगेश बुरंगे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमीक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व आरोपीचा शोध घेणे सुरु केले आहे.
गेल्या अनेक वर्षा पासुन परंडा तालूक्यातील नदीपात्रा लगदच्या गावात वाळू माफीयांनी धुमाकुळ घातला आसुन चोरीच्या वाळु व्यावसायातुन मिळवीलेल्या आमाप संपतीतुन वाळूमाफीयांची गुंडगीरी वाढली आसल्यामुळे तालूक्यात आशा अनेक वेळा घटना घडल्या आहेत.त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळू माफीयांनी नदीपात्रा लगतच्या गावात अवैध ठिक ठिकानी वाळुचे मोठमोठे साठे करून ठेवले आहेत.याची महसुल व पोलीस प्रशासनाने चोकशी करून वाळुसाठे करणाऱ्या वाळु माफीयांवर कठोर कार्यवाही करावी आशी मागणी नागरीकातून होत आहे.

सारोळा ( मां) येथे नापिकी , कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकरी पुत्राची आत्महत्या


पारा (प्रतिनिधी ): सतत च्या नापिकीला तसेच कर्जबाजारी पणाला कंटाळून वाशी तालुक्यातील सारोळा (मां)येथील एका अल्प भूधारक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.22 जून रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेघराज शेषेराव मोरे वय 35वर्ष या शेतकरी पुत्राने कष्ट करून शेतात दरवर्षी पीक घेतले होतें. परंतू सतत च्या नापिकीला तसेच विधवा आईच्या नावावर काढलेले बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून मेघराज मोरे यांनी घराशेजारील शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या भावाने पोलीसात दिल्यामुळे वाशी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्चदन प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे करण्यात आले असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहसीन खान पठाण, कॉ. नवनाथ सुरवसे , कॉ. किरण माळी करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

देवगाव(खुर्द)येथिल मुक्ताई आंगणवाडी क्र.२१६च्या इमारतीची दुरावस्था,बालकांच्या सुरक्षेचा प्रश्नन ऐरणीवर

इमारत पोखरली घुशीने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष,बालकांच्या जिवीतास धोका

या पुर्वी जि.प.शाळेच्या शोचालयाची भिंत पडून दोन विद्यार्थी झाले होते जखमी

घुशी च्या खड्डयातून अंगणवाडीत सर्प निघाल्याने बालकांत भितीचे वातावरण……

परंडा (भजनदास गुडे)
( दि २२जून ) परंडा तालूक्यातील देवगाव (खुर्द) येथिल मुक्तांई अंगणवाडी क्र. २१६ मध्ये घुशी ने पोखरल्याने इमारतीत मातीचा ढिग लागला असून फरश्या पोकळ झाल्या आहेत.या मुळे बालकांचा जिव धोक्यात आला असून या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष होत असत्याने ग्रामस्था मध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अंगणवाडीत घुशी ने पोखरल्यामुळे अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करून देण्यात यावी आशी मागणी अंगणवाडी सेवीका यांनी सरपंच व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या मागणीची ग्रामपंचायतीची दखल घेतली नाही.घुशीने पोखरलेल्या खड्डयातून सर्प निघाला होता अशी माहिती पालकांनी दिली आहे या गंभीर प्रश्ना कडे ग्रामपंचायत जानीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षी देवगाव येथील शाळेच्या सौचालयची भिंत कोसळून दोन विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटणा घडली होती. अशी घडणा घडल्यानंतर देखील ग्रामपंचायतीला जाग आलेली नाही.
एखादी अशी घटना घडण्याची ग्रामपंचायत पहात वाट आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.अंगणवाडी ची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ व पालकांनी अंगणवाडी ची पाहणी केली व तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देवराव चौधरी, नागनाथ नरसाळे,अमर महादेव चौधरी, अमोल नागनाथ चौधरी,योगेश शिंदे,धनाजी शिंदे,योगेश काळे, वैभव शिंदे,योगेश पाटील, बालाजी चौधरी आदिची उपस्थिती होती.

नीटच्या परीक्षेतील गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करा- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

धाराशिव प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट ) यांच्याकडून चार मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणं हे दुर्देवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकार कडे केली आहे. देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल हा 14 जून अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने या परीक्षेचा निकाल चार जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्न पत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळालेले आहेत. व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे.बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 718- 719 असे गुण प्रदान करण्यात आल्यायमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.ही परीक्षा भारतातील सर्वात मोठी असण्याबरोबर वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची समजली जाते. परीक्षेतील दिलेल्या ग्रेस मार्क्सचा आढावा उच्चस्तरीय समितीमार्फत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार ओमराजे यांनी केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नीट चे महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

उषा बनसोडे यांना उपचारासाठी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थीक मदत

शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील व सभापती जयकुमार जैन यांच्या हस्ते उषा बनसोडे यांच्या कुटुंबाकडे धनादेश सुपूर्द

परांडा (प्रतिनिधी)परंडा मंडई भीम नगर येथील हमाल हर्षवर्धन बनसोडे यांच्या मातोश्री उषा गजेंद्र बनसोडे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील काही दिवसा पुर्वी अपघात झाला होता.त्यांच्या उपचारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आर्थीक मदतीचा धनादेश उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रनजित पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कुटूंबीयाकडे दि८जून रोजी स्पूर्द करण्यात आला.
या आपघातात उषा बनसोडे या गंभीर जखमी झाल्या आसुन त्याना उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र त्यांची आर्थीक परिस्थिती अत्यांत हालाकीची आसल्याने रुग्लालयाचा खर्च करणे त्यांच्या कुटुंबीयांना परवडत नसल्याची बाब समोर आल्याची माहीती मा.आ ज्ञानेश्वर पाटील व मा.आ.राहुल मोटे यांना मिळाली असता पाटील व मोटे यांनी उषा बनसोडे यांना उपचारा साठी आर्थीक मदत करा आशा सुचना कृषी उत्पन्न बाजार समितीला दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उषा बनसोडे यांच्या उपचारा साठी तातडीच्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या नातेवाईकांकडे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते देन्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन,उपसभापती संजय पवार, संचालक अॅड.सुजित देवकते, शंकर जाधव,बाजार समितीचे सचिव सचिन पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, घनश्याम शिंदे,जीवन बनसोडे, रणजीत शिंदे,विजय चौतमहाल , अजय चौतमहाल,सुजाताबाई बनसोडे,बेबीताई चौतमहाल, कामीनाबाई बनसोडे यांच्या सह महिला व समाज बांधव उपस्थित होते.

सलगरा आणि किलज पंचक्रोशीतून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जास्त मताधिक्य

सलगरा,दि.५(प्रतिक भोसले) – आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम ओमराजे निंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची सुन व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना ४ लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली होती. ते अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. एकाही फेरीत महायुतीच्या अर्चना पाटील यांना आघाडी घेता आली नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी लक्षवेधी मताधिक्य खेचून घेतले आहे.

दरम्यान धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेला विरोधकांकडून काही ठिकाणी नाराजगीचे सुर उमटलेले होते, खासदारांचा फोनवरुन जनतेशी असलेला संपर्क हा चांगलाच टीकेचा विषय बनला, बसमध्ये जागा मिळवून देणं, जॅक देणं हे खासदाराचं काम आहे का? असा सवालही महायुतीच्या काही नेत्यांनी प्रचारात विचारला होता. अन् त्यातच विशेष म्हणजे राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापुरचे आमदार असताना सुध्दा आमदार पाटील यांच्या पत्नी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना कौल न देता – सलगरा, गंधोरा, किलज, वाणेगाव, वडगाव, बोरनदीवाडी, जवळगा, देवसिंगा, कार्ला, या गावकऱ्यांनी ओमराजे यांना कौल दिला आहे.

१) किलज मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२९१ आणि अर्चना पाटील यांना ३६३ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ९२८ अधिक मतं मिळाली आहेत.

२) सलगरा दिवटी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२५९ आणि अर्चना पाटील यांना ६५५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६०४ अधिक मतं मिळाली आहेत.

२) काक्रंबा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १४४० आणि अर्चना पाटील यांना ९५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४८१ अधिक मतं मिळाली आहेत.

३) जवळगा मेसाई मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६१४ आणि अर्चना पाटील यांना २३४ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३८० अधिक मतं मिळाली आहेत.

४) वाणेगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४६० आणि अर्चना पाटील यांना १५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३०१ अधिक मतं मिळाली आहेत.

५) देवसिंगा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४७९ आणि अर्चना पाटील यांना २६९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २१० अधिक मतं मिळाली आहेत.

६) वडगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३३७ आणि अर्चना पाटील यांना १८७ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १५० अधिक मतं मिळाली आहेत.

७) बोरनदीवाडी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २०८ आणि अर्चना पाटील यांना १२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ८३ अधिक मतं मिळाली आहेत.

८) गंधोरा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७०४ आणि अर्चना पाटील यांना ६२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७९ मतं अधिक मिळाली आहेत.

९) कार्ला मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५०५ आणि अर्चना पाटील यांना ४४८ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५७ अधिक मतं मिळाली आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना फुटले पाय,दिलीप नाईकवाडी, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, मंदिर सुरक्षा संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब

मागील दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल ठेवला दडवून

धाराशिव -महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकांना पाय फुटले असून त्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा अहवाल दैनिक जनमत च्या हाती लागला असून मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थान हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी सोने-चांदीचे मौल्यवान पुरातन दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यासोबतच दानपेटी घोटाळा उघडकीस आला. दोन्ही प्रकरणे न्यायालयात सुरू असून मंदिर संस्थान मध्ये कार्यरत असलेल्या तत्कालीन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरती नेहमीच भ्रष्टाचार आरोप केले गेले आहेत. एवढेच नाही तर आता तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिकाच गायब झाल्याचा प्रकार दैनिक जनमत ने समोर आणला आहे.

यात मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर आणि मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील महत्त्वाची संचिकाच गायब असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जून 2013 मधील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे दस्तावेज, श्री तुळजाभवानी मंदिरातील गैर कारभाराची चौकशी संदर्भातील सप्टेंबर 2012 मधील संचिका,  तुळजापूर दानपेटी मोजणी संदर्भातील तहसील कार्यालयाची संचिका, मंदिरातील भरती प्रक्रियेतील महत्त्वाची दस्त गायब झाले आहेत. मे 2022 मध्ये संचिका गायब प्रकरणी 3 सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करण्यात आली होती. मागील दोन वर्ष हा अहवाल गुपित ठेवण्यात आला होता. लेखाधिकारी यांच्या मार्फत चौकशी केल्यानंतर विविध विषयांच्या महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब असल्याचा अहवाल देण्यात आला होता.

मौल्यवान दागिने प्रकरण नेमकं काय आहे?

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याने तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारला. जवळपास 35 तोळे सोने, 71 किलो चांदी, 71 प्राचीन नाणी, गायब केली. या प्रकरणी 13 सप्टेंबर 2020 रोजी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच दिलीप नाईकवाडी याला अटकही करण्यात आली. नाईकवाडी याने 17 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पुरातन नाणी गायब केली. तुळजाभवानी देवीला अनेक राजेराजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैर व्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते त्याचा ठपका नाईकवाडी याच्यावर ठेवत नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती मात्र आता याच तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्र मंदिर संस्थान कार्यालयातून गायब झाले आहेत.

संचिका गायब प्रकरणी या समितीने केली चौकशी

मंदिर संस्थान लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्य समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, सहाय्यक व्यवस्थापक स्थापत्य राजकुमार भोसले या समितीने 29 एप्रिल 2022 रोजी अभिलेख कक्षामध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. दरम्यान समितीला 50 पेक्षा अधिक महत्त्वाच्या संचिका गायब असल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने या समितीने 4 मे 2022 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासनाकडे संचिका गायब असल्याचा अहवाल बनवून सुपूर्द केला. यावर मंदिर प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतली हे अद्याप समोर आले नसले तरी तरी अहवालातून उघड झालेल्या प्रकारावर मंदिर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!

महावितरणच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह

पारा येथील विशाल गोडसे च्या अंगावर पडली मेन लाईनची तार वेळ आली होती पण काळ आला नव्हता युवक सुखरूप!


पारा (राहूल शेळके): वाशी तालुक्यातील पारा येथील नवयुवक विशाल गोडसे चे दैव बलवत्तर म्हणून दि. २५ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अंगावर महावितरण ची मेन लाईनची तार पडून सुद्धा हा  युवक सुखरूप बचावला आहे .
            याबाबत अधिक माहिती अशी की , पारा येथील नवयुवक विशाल लक्ष्मण गोडसे हा युवक सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पारा गावातून स्वतःच्या शेताकडे जात असताना गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाशी रोडवर स्वतःच्या मोटरसायकल वरून जात असताना अचानक वाशी ते पारा जाणारी महावितरण ची मेन लाईनची तार तुटून अचानक अंगावर पडली व तो युवक गाडीवरून पडला . दैव बलवत्तर म्हणून या युवकाला थोडासा करंट लागला परंतु शारीरिक काही नुकसान झाले नाही. याबाबत युवकाने वाशी व पारा येथील महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईलवर संपर्क केला असता कोणीही कॉल घेतला नाही.         

दैनिक जनमतने वारंवार बातमीतून तसेच प्रतिनिधीने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेटून पारा येथेच 33 के व्ही प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करण्यात यावी म्हणून पाठपुरावा केला आहे .परंतु या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अध्याप पर्यंत काहीही कामे केलेली नाहीत. अशा निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या पारा 33 के वी चे काही देणे घेणे दिसत नाही .पावसाळापूर्वी प्रि मेन्टेनन्स ची   कामे जर वाशी महावितरण केले असते तर आज ही वेळ आली नसती. वाशि महावितरण ने या गंभीर गोष्टीची दखल घेऊन प्रि मान्सून मेन्टेनन्स ची कामे करावीत अन् ग्राहकांना विज पुरवठा सुरळीत द्यावा अशी मागणी होत आहे.

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात; आठवडाभरात १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाईची रक्कम – आ. राणाजगजितसिंह पाटील

खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत विहित मुदतीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सुरू केली असून तक्रार दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील विमा वितरित करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या २५% अग्रीम प्रमाणे रु. २५३ कोटी यापूर्वीच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. खरीप हंगामात अवेळी पावसाने देखील सोयबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. याबाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचे आवाहन त्यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना केले होते. या अनुषंगाने नुकसानीच्या साधारणत: १,९२,००० ऑनलाईन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाई रकमेचे वितरण सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीत खरीप हंगामा ची पेरणी तोंडावर असताना पेरणी पूर्वी पैसे उपलब्ध होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यामुळे त्यांना मोठा आधार मिळत आहे. ठाकरे सरकारच्या काळातील खरीप २०२० व २०२१ मधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.