राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ई.डी. ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादी- काँग्रेस-आरपीआय आघाडीचा गमजा घातला होता. सुरेश पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करून मोजकेच दिवस झाले आहेत. त्यांच्याकडे आघाडीच्या प्रचाराचा गमजा दिसल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काल मुंबईत इच्छुक उमेदवारांना बोलावण्यात आले होते. मुंबईहून येताना सुरेश पाटील प्रचार साहीत्य घेऊन आल्याचे बोलले जात आहे.मात्र अद्याप पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात आहे.
सुरेश पाटलांना मिळणार राष्ट्रवादीची उमेदवारी?
पार्टनरशिप मध्ये फार्मसी चालू करण्याच्या नावाखाली 50 लाखाची फसवणूक
हॉस्पिटलमध्ये औषध पुरविण्याची संधी आली असून
आपण दोघे पार्टनरशिपद्वारे फार्मसी उघडून या
ठिकाणी आपण बिजनेस करू असे सांगून फिर्यादी
कडून वेळोवेळी पन्नास लाख रुपये घेऊन फार्मसी
चालू करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची
घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विजयवाडा आंध्र प्रदेश येथील
नात्यातील दोघा व्यक्तींविरुद्ध सदर बाजार पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत आयप्पा
कोत्ता (वय ३४ राहणार रूची नगर जुळे सोला-
पूर) यांनी फिर्याद दिली असून व्यंकट संत्यनारायण
कोत्ता व वीर वेंकटा गिरीनाथ कोत्ता (दोघे राहणार
विजयवाडा आंध्रप्रदेश) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे
दाखल झाले. यातील फिर्यादी हे गेल्या दहा वर्षापासून
सोलापुरात एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून
काम करत आहे. तर आरोपी हे आंध्रप्रदेश येथील
फिर्यादी यांचे नातेवाईक आहे.वरील आरोपींनी सन
२०१५ ते २०१७ या कालावधीत आंध्रप्रदेश येथील
हॉस्पिटलमध्ये औषध पुरवण्याच्या नावाखाली चंद्रा
लहान बालकांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी*. *डॉ.मृणालिनी पंडीत बुटूकने*
डॉ.सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्या वतीने, बालक व किशोरवयीन मुलांमुलींसाठी ‘नकोसा स्पर्श’ (गुड टच बँड टच) या विषयाचे प्रबोधन करण्यासाठी तुरोरी ता उमरगा येथील श्री. ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.
शालेय पोषण आहारात मृत पाल , ग्रामस्थांचा शाळेत ठिय्या!
बुधवारी दि.२५ रोजी मध्यान्ह भोजन शालेय पोषण आहार अधिक्षक व्ही.जी राठोड व विस्तार अधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेत येवून पंचनामा केला. शाळेतील होणाऱ्या गंभीर घटनेच्या ग्रामस्थामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गावातील पालकांनी शाळेत ठिय्या मांडला तसेच संतप्त पालकांनी मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ग्रामस्थांनी शाळेतील इतर अडचणीचनी बाबतीत ही आक्षेप घेतला तसेच मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी गावातील लोकांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे . सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन भात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे . कुठल्याच विद्याार्थ्याना त्रास झाल्याची तक्रार नाही यामुुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा ग्रामस्थातुन होती .
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष विकास पाटिल , सरपंच रविंद्र हंगरगे , चेअरमन भीमराव पाटिल , प्रविण जाधव , शिवाजी सुरवसे , गोरख तेलंग , हरीदास सुरवसे , प्रभाकर बिराजदार , विठ्ठल कुर्लेकर , सुग्रीव वाडीकर , संतराम काळे , शिवाजी बिराजदार , गणपती मिरगाळे , विष्णू बिराजदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
———–
शालेय पोषण आहार इतर विद्यार्थी व शिक्षकांनीही खाल्लेला असुन त्यांना कोणतीही विषबाधा किंवा त्रास झालेला नाही . घरी घेवुन गेलेल्या डब्यात पाल आढळली आहे . पुढील योग्य ती कार्यवाही सुरू आहे -_बिराजदार एस.व्ही. ( विस्तार अधिकारी पं .स. शिक्षण )
राणा दादांसाठी कार्यकर्त्यांच्या भावनिक पोस्ट
उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागत असतानाच राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. सतिश दंडनाईक, स्वानंद पाटील, मनगोत शिनगारे या पाटील समर्थकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात झाला रक्ताचा तुटवडा, रक्तसंकल नच थंडावले
महापुरामुळे बसला फटका डेंग्यू सह अन्य रुग्णांची ससेहोलपट, रक्तासाठी नातेवाईकांची होते धावपळ…
निकीती निकम:- पाचगाव
महापुरामुळे गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदान शिबिरच न झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तपेढीत रक्ताचा ठणठणाट झाल्याने रुग्णालयातून मागणी झाली तर रक्त द्यायचे कोठून असा पेच आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने डेंग्युसह इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने रक्ताविना रुग्णांची ससेहोलपट होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या मोठी आहे सण,समारंभ, वाढदिवसापासून ,निमित्त मिळेल त्यावेळी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. एखादी आपत्ती आली तरी मदतीसाठी सर्वात पुढे कोल्हापूर करच असतात .त्यामुळे कोल्हापूरकरांची रक्ताची गरज भागवून इतर जिल्ह्यांना रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो .पण महापुरामुळे रक्तदान शिबिरे होऊअपेक्षीत अशी होऊ शकलेली नाहीत .महापुराच्या कालावधीत आठ-दहा दिवस सगळेच व्यवहार ठप्प होते
ऑगस्ट महिन्यात वर्षभरातील उच्चांकी रक्त संकलन होते १५ ऑगस्टला तर बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते पण यंदा ते होऊ शकले नाही त्याचा परिणामही रक्तसंकलनावर झाला आहे महापूर ओसरल्याने सगळीकडे दुर्गंधी, घाण पहावयास मिळत आहे घाणीमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालय तुडुंब झालेली दिसतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे त्यांना बाहेरून रक्त व रक्त घटकांची गरज लागते पण रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाटअसल्याने त्यांना वेळेत रक्तपुरवठा होत नाही……
चौकट
प्लेटलेटस्ची मागणी जास्त वाढली ..
डेंग्युमूळे रोज ४० हून अधिक रक्त पिशव्यांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे यामध्ये प्लेटलेटस्ची मागणी अधिक आहे विशेष म्हणजे प्लेटलेटस्चे आयुष्य केवळ पाच दिवस असल्याने त्यांची साठवणूक करता येत ना…
*ही रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे…
रक्ताची गरज आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे .त्यामुळे रुग्णांसाठी रक्तदात्यांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन ऐच्छीक रक्तदान करावे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था ,तरुण मंडळांनी, स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजूंना रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावावा…
– स्वराज्य मित्र मंडळ कोल्हापूर.
अध्यक्ष :-अभिजीत पोवार






































