28 November 2026, Saturdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
दैनिक जनमत
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
देश-विदेश

धाराशिव शहरात पुन्हा चोरट्यांचा वावर? पोलिसांची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी

जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली; अनोळखी व्यक्ती फिरतानाचा व्हिडिओ समोर

धाराशिव : शहरात पुन्हा एकदा चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील जुना उपळा रस्ता, कर्मवीर नगर परिसरात मध्यरात्री चार ते पाच अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील निवासी भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अनोळखी व्यक्ती या परिसरात फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्यक्ती चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत असाव्यात, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची ओळख आणि त्यांच्या फिरण्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.

यापूर्वी १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शहरातील राधिका हॉटेलच्या पाठीमागील परिसरात चोरट्यांनी तब्बल पाच घरे फोडली होती. या घटनेला पंधरा दिवसही उलटले नसताना पुन्हा अनोळखी व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींचा व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

चोरीच्या घटना घडल्यानंतर कारवाई करण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेषतः शहराच्या विस्तारित निवासी भागांसह अंतर्गत रस्त्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांची नियमित गस्त असणे आवश्यक आहे.

समोर आलेल्या व्हिडिओची पोलिसांनी तपासणी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी. तसेच जुना उपळा रस्ता, कर्मवीर नगरसह शहरातील विविध निवासी भागांमध्ये रात्रीची गस्त वाढवून नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.