प्रि जीबी, पत्रकारांना मज्जाव धाराशिव नगरपालिकेचा असाही इतिहास

0
432

धाराशिव (आकाश नरोटे) – धाराशिव नगरपालिकेचा रणसंग्राम सध्या सुरू असून काही दिवसात शहराच्या प्रथम नागरिकाची निवड जनता करणार असून पूर्वी सदस्यांमधून निवडले जाणारे नगराध्यक्षपद आता थेट नागरिक निवडणार आहेत. सध्याची निवडणूक निधी स्थगिती, पायाभूत सुविधा याभोवती फिरणार असली तरी भाजपने राष्ट्रीय पॅटर्न वापरला असून देशात नरेंद्र मोदींचा चेहरा वापरून मत मागितले जाते तसे धाराशिव नगरपालिकेसाठी तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा चेहरा वापरला आहे. तर इतर पक्षांनी आपापल्या उमेदवारालाच सक्षम चेहरा म्हणून वापरले आहे.

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यापूर्वी पाटील परिवाराची सत्ता होती त्या काळात जी व्यक्ती अध्यक्ष असायची त्याला विशेष म्हणून अधिकार नव्हते कारण जेव्हा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा व्हायची त्या सभेला वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना मध्ये येऊ दिले जात नव्हते. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांचा अधिकार असताना त्यांना थेट ‘भवन’ वरून ‘आदेश’ यायचे. सर्व पत्रकार नगराध्यक्षांना जेव्हा प्रवेश देण्याबाबत विचाराचे तेव्हा अध्यक्ष हात वर करून नकार द्यायचे. त्यामुळे सर्वसाधारण सभेत काय घडले हे समजत नव्हते. तसेच ही सर्वसाधारण सभा होण्यापूर्वी त्याच भवन मध्ये एक प्रि जीबी केली जायची तिथे जे विषय ठरतील तेच विषय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतले जात असल्याचे त्यावेळचे नगरसेवक अगदी दबक्या आवाजात सांगायचे.

येत्या निवडणुकीत जनता कोणाच्या मागे राहते हे मतदानानंतर समजेल मात्र आपला सेवक निवडताना जनता तो सेवक आधीच कोणाचा सेवक आहे की नाही याची चाचपणी करणार असल्याची चर्चा आहे. पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देणे ही तर किरकोळ बाब आहे. मत मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला नागरिकांनी पत्रकारांना प्रवेश दिला जाईल की नाही याबाबत विचारले तरच निवडणुकांना अर्थ राहणार आहे. जनतेचा सेवक रबर स्टॅम्प ठरू द्यायचा नसेल तर सद्सद्विवेक बुद्धी प्रत्येक नागरिक वापरेल याबाबत शंका नाही. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी नगरसेवकांकडून काम करणार असल्याचे हमीपत्र घेतले जात आहे जनतेच्या तक्रारी लेखी घेणारे किंवा तक्रार असल्यास तोंडी तक्रार देण्या एवजी लेखी तक्रार करण्याची मागणी करणारे लोक प्रतिनिधी त्यांचे उमेदवार किंवा त्यांचा पक्ष कोणती कामे करणार याचे लेखी हमीपत्र देईल का? हा देखील या निवडणुकीत औत्सुक्याचा विषय राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here