पारदर्शक कारभाराचा वचननामा टांगला वेशीवर,भाजपने पत्रकारांना बाहेर काढून दाखवलं!

0
54

तुतारी और कमल एकीच है!

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित पत्रकारांना बाहेर हाकलवून भाजपने पारदर्शक कारभार करणार असल्याच्या वचननाम्याला वेशीवर टांगून तिलांजली वाहिली आहे. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांना आत बसू दिले जात होते वार्तांकन करू दिले जात होते मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपच्या नगराध्यक्षांनी आणि नगरसेवकांनी पत्रकारांना एन्ट्री देण्यास विरोध केला आणि बाहेर जाण्यास सांगितले पत्रकारांना आत बसू द्या अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते आणि नगरसेवकांनी मांडली मात्र त्याची दखल पीठासन अधिकाऱ्यांनी घेतली नाही तसेच भाजपच्या गटनेत्यांनी देखील त्याला विरोध केला.

उपनगराध्यक्षांनी कानात सांगितलं आणि अध्यक्षांनी ऐकलं

पत्रकार सभागृहात गेल्यानंतर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी अध्यक्षांच्या कानात हळूच पत्रकार आल्याचे सांगितले आणि त्यानंतरच अध्यक्षांनी पत्रकारांना बाहेर जाण्याची विनंती केली मात्र यापूर्वी पत्रकार सभागृहात उपस्थित राहत होते हे विरोधकांनी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी पत्रकारांना उपस्थित राहण्यास विरोध केला

तुतारी और कमल एकीच है!

पत्रकारांना बसू देऊ नका जशी भाजपची भूमिका होती त्या भूमिकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मूक समती होती त्यांच्या वतीने ना त्यांचे गटनेते बोलले ना नगरसेवक त्यामुळे काही दिवसापूर्वी वायरल झालेला एक व्हिडिओ आणि त्यातील संवाद तुतारी और कमल एकीचे हे सत्यात उतरते

वचननामा पाळायचा नसतो हे पहिल्याच सभेत दिसले

पारदर्शक कारभार करायचा असल्यास सभागृहात काय चाललंय हे नागरिकांना कळण्याचे महत्त्वाचे साधन आणि दुवा पत्रकार आणि माध्यमे असतात
रामराज्याप्रमाणे कारभार करून असे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने पारदर्शक कारभार करण्याचे वचन दिले मात्र वचननामा पाळायचा नसतो हे पत्रकारांना बाहेर काढून दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here