नगरपालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

0
154

 


उस्मानाबाद नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगर पंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार संघटना संघर्ष समिती, राज्यातील नगर परिषद, नगर पंचायती मधील कर्मचारांना न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी १ मे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हा राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारात मार्फत करण्यात यावे,सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी, राज्यातील नगरपालिका नगरपंचायती मागणीपेक्षा कमी देण्यात आलेले सहाय्यक अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे, राज्यातील नगरपंचायती मधील पूर्वीचे व उद्घोषणा नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सरसकट समावेशन करावे तसेच नागपूर विभागातील नगरपंचायती मधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचारी व मित्र संस्था नाशिक यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे राहिलेल्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ समावेशन करण्यात यावे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा सेवानिवृत्त व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी राज्यातील नगरपालिका नगरपंचायती कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार दिनांक १ जानेवारी २०१६ पासून दहा वीस तीस प्रगती योजना त्वरित लागू करावी सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून देण्यात यावेत व त्यांच्या पाल्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात यावी राज्यातील नगरपालिका नगरपंचायती व बंद करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नगरपालिका व नगरपंचायत सेवेत सामावून घेण्यात यावी सफाई कामगारांना राज्य सफाई आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात यावेत तसेच सफाई कामगारांना व अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्ट्यांना मोबदला देण्यात यावा. इत्यादी मागणीसाठी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here