पारा येथे भव्य खुल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
63

   पहिले राजस्थान (दिल्ली )तर दुसरे बक्षीस जेजुरी संघाने पटकाविले



पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील पारा येथे दि.30 एप्रिल रोजी माजी हॉलीबॉल पटू श्री.सर्जेराव आबा पाटील व कै.सुरेश बाबुराव भराटे यांच्या स्मरणार्थ भव्य खुल्या ढकली हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 28संघांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी सकाळी पार पडले.

         या स्पर्धेत शिवसेनेचे भूम -परांडा -वाशी चे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या तर्फे पहिले पारितोषिक 51000/ रु राजस्थान (दिल्ली )संघाने , दुसरे पारितोषिक वाशीचे शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे यांचे 41000/ रु जेजुरी संघाने , तिसरे पारितोषिक पारा चे उपसरपंच अतुल चौधरी यांचे 31000 / रु सोलापूर संघाने ,चौथे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव कवडे यांचे 21000/ रु पारा संघाने , पाचवे पारितोषिक शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी यांचे 11000/ रू दिल्ली संघाने , सहावे पारितोषिक उपसभापती विष्णुपंत मुरकुटे यांचे 10000/ रु मुरुड संघाने , सातवे पारितोषिक पत्रकार राहुल शेळके यांचे 9000/रु येडशी संघाने , आठवे जि. प सदस्य रामभाऊ खंडागळे यांचे 8000/ रु पारा संघाने तर  शिस्तबद्ध संघ म्हणून डोंजा संघाने बक्षीस पटकावले . यावेळी प्रशांत बाबा चेडे, विष्णुपंत मुरकुटे, राजेंद्र काशीद, अतुल चौधरी, सर्जेराव पाटील, जीवन भराटे,  बिभीषण भराटे, जयंत पानसे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यासाठी अशोक भराटे ,अर्जुन ढेंगळे , सखाराम भराटे, सुंदर माळी, शशिकांत टाचतोडे, सचिन भराटे,विकास भराटे ,नकुल घरत,अक्षय गवळी , दत्तात्रय भराटे, , संजय फुरडे, अतुल धुमाळ, प्रदीप पाटील ,समीर शेख, केकान सर, शायक सय्यद , आणि संपूर्ण पारा हॉलीबॉल संघ, गावकरी तरुण मित्र मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here