ईट(प्रतिनिधी) ईट येथील वीज वितरण कंपनीच्या शाखेकडून ईटसह परिसरात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. तसेच वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित पण होतो . तसेच लोडशेडिंग यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले असून हे प्रकार असेच सुरू राहिल्यास दिनांक चार मे रोजी जातेगाव -भुम रोड वर नागेवाडी चौकांमध्ये युवा सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन युवा सेना तालुका प्रमुख निलेश चव्हाण तसेच प्रविण देशमुख ,राकेश भोसले आदींनी दिलेल आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विद्युत पुरवठा कमी चालत असल्याने फॅन कुलर चालत नाहीत . यामुळे याचा विशेष करून त्रास लहान बालकांना व वयोवृद्ध नागरिकांना होत आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे कामकाज ही कमी दाबाने चालणारे विजेमुळे बंद पडत आहे .यामुळे या परिसरातील नागरिकांना आर्थिक ही त्रास सहन करावा लागत आहे. तरी विद्युत पुरवठा याबाबत नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात अन्यथा युवा सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.