मुगाव (प्रतिनिधी)
परंडा तालुक्यातील मौजे पारेवाडी येथे काल दिनांक १५ रोजी नरसिंह जयंती निमित्त ह.भ. प.अमोल महाराज नकाते चुंबळीकर यांचे काल्याचे किर्तनाचे आयोजन अनंत शास्ती पौळ (काका) यांचेतर्फे केले होते. यावेळी नकाते महाराजांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नका, आई वडिलांची सेवा करा, मोबाईलचा अतिवापर टाळा तसेच लहान मुलांवर योग्य वेळी योग्य ते संस्कार करावे जेणेकरून ते एक आदर्श नागरिक बनतील व समाजाचे व देशाचे नाव मोठे करतील असा संदेश कीर्तनातून दिला.. यावेळी गायनाचार्य ह.भ.प. दत्ता गाढवे, मृदंगाचार्य ह.भ.प. कृष्णा घोगरे, यांची साथ लाभली तर बालटाळकर्यांनी परिसर दनानुन सोडला.
यासाठी ह.भ.प. शिवरामा महाराज बिडवे व जय हनुमान मित्र मंडळ पारेवाडी यांनी परिश्रम घेतले…