महिलांनी चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा केला निषेध
परंडा( भजनदास गुडे) महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारच्या विरोधात अंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या मराठवाडा अध्यक्षा वैशाली मोटे व मा.नगराध्यक्ष जाकीर सोदागर यांच्या नेतृत्वाखाली दि १५ मे रोजी टिपू सुलतान चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या काळात वाढणारी महागाई पाहता हे आंदोलन करण्यात आले. घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर खूपच वाढले आहेत. रोज वापर होणाऱ्या पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किमतीही हैराण करणाऱ्या आहेत. देशातील वाढणारी महागाई त्याच बेरोजगारीमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींवर आज पारंपरिक लाकूड फाटा व गवरीवर स्वयंपाक करण्याची वेळ ग्रामीण भागात आली आहे. याचा निषेध म्हणून परंडा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने चुलीवर भाकरी केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महेबुब शेख,राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर,माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवकप्रदेश महिला जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे,युवती जिल्हाध्यक्षा स्वाती ध्रुवकर, महिला तालुका अध्यक्ष स्वाती गायकवाड यांनी महागाई विरोधात भाषणे करून केद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत गॅस.दरवाढीचा आणि महागाईचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने या घटनेचा निषेध नोंदवत चितळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड.संदीप खोसे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव अमोल काळे, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, सचिन पाटील, बच्चन गायकवाड,तनवीर मुजावर,धनंजय हांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वाजिद दखनी,माजी नगरसेवक संजय घाडगे,बापु मिस्किन, आप्पा बनसोडे, हनुमंत गायकवाड,शरद झोबांडे, बाबूराव काळे, बाळासाहेब बैरागी, बिभीषण खुने, विजय काळे, मलिक सय्यद,राजकुमार माने,मोहसीन सौदागर,राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष जावेद मुजावर,माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता जाधव,माजी पंचायत समिती सुषमा शिंदे,माजी नगरसेविका रत्नमाला बनसोडे,माजी नगरसेविका संजना माने,राखी देशमुख,दिपाली रगडे,वैष्णवी बैरागी,अनिता राऊत यांच्या सह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलंन राष्ट्रवादी सामाजीक विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे यांनी केले.