(मुकेश नायगांवकर)
उस्मानाबाद- १८
लांबलेल्या संपानंतर कामावर हजर झालेल्या उस्मानाबादच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी आता जोमाने कामगिरी करत उस्मानाबाद- बेंगलोर गाडीचे 79 हजार रुपयाचे विक्रमी उत्पन्न आणले. उस्मानाबाद बस आगारातील वाहक बी.जे.कांबळे व पी.एम.डोरले,चालक अमोल म्हेत्रे व एम.एस.गायकवाड यांनी ही विक्रमी उत्पन्नाची कामगिरी केली.याबद्दल
आगारप्रमुख श्री.पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करुन प्रोत्साहित केले.
उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे उस्मानाबाद बसस्थानकांवर सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .
उस्मानाबादहून पुण्याला दिवसभरात बारा गाड्या सुटत आहेत .तसेच हैदराबाद ,मुंबई, बोरवली, सुरत, औरंगाबाद, या गाड्या आता वेळेवर धावत असून मोठे उत्पन्न घेऊन येत आहेत त्यामुळे संपकाळात उस्मानाबाद आगारातील बुडालेल्या उत्पन्नाला थोडाफार हातभार लागून लवकरच नियमित उत्पन्न मिळेल शिवाय प्रवाशांना सोयी व सवलती मिळतील.व प्रवास सुखाचा होईल अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.